Chandrakant Patil : ‘आंबा चोरला म्हणून…’; चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याने नवा वाद! हर्षवर्धन सपकाळ, अमित ठाकरेंकडून सडकून टीका
Chandrakant Patil : अशातच भाजप नेते आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या एका वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला आहे.

Sapakal criticizes Chandrakant Patil’s statement; Amit Thackeray also criticizes it : नीट पेपरफुटी प्रकरणी दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. आज या आंदोलनाला ३६ दिवस पूर्ण झाले आहेत.
या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई केली जाईल असे आश्वासन देण्यात आले आहे. मात्र केंद्र सरकारने केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊन इतर काही मागण्या मान्य कराव्यात यावर आंदोलनकर्ते ठाम असून, प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय इतर मागण्या केंद्र सरकारने मान्य केल्याचे आश्वासन दिले आहे.
दिल्लीतील या आंदोलनाचे पडसाद महाराष्ट्रात देखील उमटले आहेत. अशातच भाजप नेते आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या एका वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला आहे.
त्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत असून, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर सडकून टीका केली आहे.
चंद्रकांत पाटील साहेब, आंबा चोरीला गेला तर दुसरा विकत घेता येतो… पण पेपरफुटीमुळे उद्ध्वस्त झालेलं विद्यार्थ्याचं भविष्य कुठल्या बाजारात मिळतं? आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांना नवीन लेकरू कुठल्या बाजारात मिळणार?
१५२ पेपरफुटी, कोट्यवधी विद्यार्थी त्रस्त झाले… pic.twitter.com/ZWPR2sPvKD
— Harshwardhan Sapkal (@INCHarshsapkal) July 24, 2026
…आणि तरीही हा विषय तुम्हाला “आंबा चोरी”एवढा किरकोळ वाटतो? (Chandrakant Patil)
चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याचा समाचार घेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत टीका केली. ते म्हणाले की, “चंद्रकांत पाटील साहेब, आंबा चोरीला गेला तर दुसरा विकत घेता येतो… पण पेपरफुटीमुळे उद्ध्वस्त झालेलं विद्यार्थ्याचं भविष्य कुठल्या बाजारात मिळतं? आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांना नवीन लेकरू कुठल्या बाजारात मिळणार? १५२ पेपरफुटी, कोट्यवधी विद्यार्थी त्रस्त झाले आहेत… आणि तरीही हा विषय तुम्हाला “आंबा चोरी”एवढा किरकोळ वाटतो? विद्यार्थ्यांच्या भविष्याची अशी थट्टा करणाऱ्या व्यक्तीकडे राज्याचं उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय असणं, हीच महाराष्ट्राची सर्वात मोठी शोकांतिका आहे.”
आता ते काय बोलत आहेत, हे पण त्यांना कळत नाहीये. (Chandrakant Patil)
दुसरीकडे मनसे नेते अमित ठाकरे यांनीही चंद्रकांत पाटलांनी केलेल्या वक्तव्यावर अत्यंत कठोर शब्दांत टीका केली आहे. ते म्हणाले “तिथे २० मुला-मुलींनी आत्महत्या केली आहे. तुम्ही त्याची तुलना आंबे चोरी करण्याशी करताय . म्हणजे आता ते काय बोलत आहेत, हे पण त्यांना कळत नाहीये. हे कुठेतरी भरकटले आहेत. भाजपच्या अनेक प्रवक्त्यांचे मी व्हिडीओ पाहिले, आधी ते किंचाळायचे, पण आता देश पेटलायं हे त्यांनाही कळलं आहे.”
नेमकं काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
“एखादा पेपर फुटल्यानंतर.. म्हणजे एखाद्याने एक आंबा चोरला, तर त्याची शिक्षा फाशी नसते ना? आंबा चोरला, तर समज देणं असतं. आणखी काही चोरलं, त्याची शिक्षा ठरली असते. प्रत्येक गोष्टीला.. फाशी फाशी असं नसतं ना,” असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.





