Nirmala Sitharaman: “NEET पेपरफुटीनंतर विद्यार्थांनी फायदा घेतला”; निर्मला सीतारमण यांचे अजब विधान; सीजेपी आणि विरोधक म्हणाले..
Nirmala Sitharaman : सीजेपीचे प्रवक्ते आशुतोष रांका व्हिडिओ शेअर करत लगावला टोला

Nirmala Sitharaman : नीट (NEET) पेपरफुटीच्या मुद्द्यावरून दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
अर्थमंत्री सीतारमण यांनी, “नीटचा पेपर फुटल्यानंतर निश्चितच विद्यार्थ्यांना दुःख वाटले असेल. पण त्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी आणखी जोमाने तयारी केली आणि दुसऱ्यांदा झालेल्या नीट परीक्षेत चांगले यश मिळवले,” असे विधान केले आहे. त्यांच्या या विधानावरुन त्यांच्यावर टीका केली जात आहे. सीजेपी आणि विरोधकांनी सीतारमण यांनी पेपरफुटीचे एकप्रकारे समर्थन केले असल्याचा आरोप केला आहे.
‘विद्यार्थ्यांनी आव्हानाचा सामना करत यश मिळवले’
अर्थमंत्री सीतारमण म्हणाल्या, “असे अनेक तरुण आहेत जे पुढे येऊन सांगत आहेत की, जेव्हा पेपर लीक झाला तेव्हा आम्हाला वाईट वाटले. पण आम्ही त्या परिस्थितीचा सकारात्मक फायदा घेतला आणि अधिक मेहनत घेऊन आमची कामगिरी सुधारली. त्यामुळे अशा आव्हानांना स्वीकारून यश मिळवणारे तरुणही देशात आहेत.”
By this logic every paper in this country should get leaked. https://t.co/kSrVyZ9HMr
— Ashutosh Ranka (@AshutoshRanka) July 24, 2026
सीतारमण यांचे विरोधकांना प्रत्युत्तर
सीतारमण यांनी पुढे सांगितले की, “या घटनेनंतर सरकारने त्वरित पावले उचलली. आरोपींना अटक करण्यात आली, योग्य वेळेत पुनर्परीक्षा घेण्यात आली आणि निकालही जाहीर झाले. यामुळे आज तरुण त्यांच्या क्षमतेनुसार महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेत आहेत. हा विषय देशातील विद्यार्थ्यांच्या भविष्याशी आणि त्यांच्या परीक्षेच्या तयारीशी जोडलेला असल्याने अत्यंत संवेदनशील आहे. जर सरकार संवेदनशील नसते किंवा कोणतीही प्रतिक्रिया दिली नसती, तर विरोधकांची टीका समजण्यासारखी होती. परंतु, खुद्द पंतप्रधान पातळीवरून यावर उत्तर देण्यात आले असून दोषींना कडक शिक्षा देण्याचे वचन दिले गेले आहे,” असे म्हणत सीतारामण यांनी विरोधकांवरही हल्लाबोल केला.
दरम्यान, निर्मला सीतारमण यांच्या विधानावर सीजेपीचे प्रवक्ते आशुतोष रांका यांनी टीका केली. एक्सवर त्यांनी सीतारमण यांचा व्हिडीओ शेअर करत, ‘या तर्काने देशातील प्रत्येक पेपर फुटला पाहिजे,’ असे कॅप्शन देत सीतारमण यांना टोला लगावला आहे.
तर तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांनीही एक्सवर पोस्ट शेअर करत, “पेपरफुटीमुळे मुलांना अधिक वेळ मिळाला आणि त्यांनी अभ्यास करून चांगली कामगिरी केली’, असे सितारमण यांना म्हणायचे आहे का? खरेतर संपूर्ण मंत्रिमंडळानेच आता राजीनामा देण्याची वेळ आली आहे,” असे म्हंटले आहे.
हेही वाचा :
Buldhana News : आषाढी एकादशीनिमित्त शेवगावमधील गजानन महाराज मंदिरात भाविकांची गर्दी





