Monsoon Update: मान्सून पुन्हा सक्रिय होणार; पुढील 3 ते 4 दिवसांत पाऊस बरसण्याचा अंदाज
Monsoon Update: शेवटच्या आठवड्यात मुंबईसह संपूर्ण कोकणात जोरदार मान्सूनची शक्यता

Monsoon Update: मान्सूनबाबत एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. मान्सूनसाठी पोषक वतावरण निर्माण झाले असून राज्यातील विविध भागात पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. चक्राकार वाऱ्यामुळे मान्सूनचा प्रवास रखडला होता. पण आठवडाभरात मान्सून पुर्ण महाराष्ट्र व्यापणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मान्सून पुन्हा एकदा पुढच्या प्रवासासाठी सज्ज झाला असून, २३ जूनच्या आसपास तो महाराष्ट्रासह देशातील इतर राज्यांमध्ये वेगाने पुढे सरकणार आहे. मान्सून लवकरच दक्षिण कोकण आणि महाराष्ट्रालगतच्या भागात मान्सून पुन्हा सक्रिय होईल.
पावसाचा जोर वाढून जूनच्या शेवटच्या आठवड्यात तो मुंबईसह उत्तर कोकण आणि महाराष्ट्राच्या अंतर्गत भागांपर्यंत पोहोचेल. पुढील तीन ते चार दिवसांत पुण्यासह राज्यभरात मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
तर पूर्व मराठवाडा व विदर्भात मात्र जुलै पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात मान्सूनच्या शक्यता आहे. तत्पूर्वी तुरळक ठिकाणी किरकोळ पूर्वमोसमी पावसाची शक्यता आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात वाढलेल्या उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना शनिवारी मोठा दिलासा मिळेल. आज पुण्यात सकाळपासून काहीसे ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे.
वर्धा, यवतमाळ, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत उष्ण हवामानासह वादळी पावसाचा अंदाज आहे. तर सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांत वादळी पावसाचा अंदाज असल्याने येलो अलर्ट दिला आहे. आजही विदर्भात उष्ण लाटेची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. Monsoon Update
हेही वाचा :






