Samantha Ruth Prabhu: लग्नानंतर सामंथाचा दमदार कमबॅक; ‘मा इंटी बंगाराम’ या तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला
Samantha Ruth Prabhu समंथाने स्वतः सोशल मीडियावर या चित्रपटाचा नवीन पोस्टर शेअर करत रिलीज डेट जाहीर केली. ‘मा इंटी बंगाराम’ हा चित्रपट 15 मे 2026 रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. पोस्टरमध्ये सामंथाचा साइड प्रोफाइल दिसतो.

Samantha Ruth Prabhu: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री समांथा रूथ प्रभू सध्या तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. अलीकडेच विवाहबंधनात अडकलेल्या सामंथाने काही काळ कुटुंबासोबत घालवला. मात्र आता तिने पुन्हा एकदा जोरदार कमबॅक करत नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. तिचा आगामी तेलुगू चित्रपट मा इंटी बंगाराम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
समंथाने स्वतः सोशल मीडियावर या चित्रपटाचा नवीन पोस्टर शेअर करत रिलीज डेट जाहीर केली. ‘मा इंटी बंगाराम’ हा चित्रपट 15 मे 2026 रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. पोस्टरमध्ये सामंथाचा साइड प्रोफाइल दिसतो. ती भिंतीमागून डोकावताना दिसत असून तिच्या चेहऱ्यावर सस्पेन्स आणि ठामपणा स्पष्ट जाणवतो. पोस्टरवरील “या उन्हाळ्यात थिएटरमध्ये भेटूया” या ओळीमुळे चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

Ma Inti Bangaram
या चित्रपटाचे दिग्दर्शन Nandini Reddy यांनी केले आहे. तर निर्मितीची जबाबदारी सामंथाचे पती राज निदिमोरू यांनी सांभाळली आहे. त्यामुळे हा प्रोजेक्ट वैयक्तिकदृष्ट्याही सामंथासाठी खास मानला जात आहे.
काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझरही प्रदर्शित झाला होता. टीझरमध्ये सामंथाचा पूर्णपणे वेगळा अंदाज पाहायला मिळाला. साडी परिधान करून ती दमदार अॅक्शन करताना दिसली. तिचा हा अॅक्शन अवतार चाहत्यांसाठी आश्चर्याचा धक्का होता. त्याचबरोबर ती कुटुंबातील जबाबदार आणि प्रेमळ सदस्य म्हणूनही दिसते. त्यामुळे या चित्रपटात अॅक्शनसोबतच भावनिक आणि कौटुंबिक नाट्यही पाहायला मिळणार असल्याचे संकेत मिळतात.
View this post on Instagram
सामंथाने पोस्टर शेअर केल्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या. अनेकांनी “कमबॅक क्वीन” असे संबोधत तिचे कौतुक केले. काहींनी हा चित्रपट 2026 मधील सर्वात मोठा चित्रपट ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. लग्नानंतरची ही तिची पहिली रिलीज असल्यामुळे प्रेक्षकांच्या अपेक्षा अधिक वाढल्या आहेत.
एकंदरीत, ‘मा इंटी बंगाराम’ हा चित्रपट अॅक्शन, इमोशन आणि कौटुंबिक कथानक यांचा संगम असलेला ठरणार आहे. सामंथाचा दमदार अभिनय आणि वेगळा लूक पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत. आता सर्वांच्या नजरा 15 मे 2026 या तारखेकडे लागल्या आहेत, जेव्हा सामंथा रुथ प्रभू पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर आपली जादू दाखवताना दिसेल.





