VIDEO: धक्काबुक्की अन् पाय लटपटले…; चाहत्यांच्या उतावळेपणामुळे समंथा रुथ प्रभू अस्वस्थ

Samantha Ruth Prabhu | काही दिवसांपूर्वी अभिनेत्री निधी अग्रवालचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाला होता. ज्यात तिच्याभोवती चाहत्यांची मोठी गर्दी जमल्याचे पाहायला मिळाले होते. इतकेच काय तर, तिला धक्काबुक्की देखील झाली होती. गर्दीतून वाट काढत गाडीपर्यंत पोहोचण्यासाठीही तिला खूप कसरत करावी लागली होती. ज्यामुळे ती काहीशी घाबरल्याचे देखील पाहायला मिळाले होते. निधीनंतर आता अभिनेत्री समंथा रुथ प्रभूसोबत देखील अशीच घटना घडली आहे.
समंथा हैदराबादमधील एका शॉपच्या उद्घाटन सोहळ्याला पोहोचली होती. या कार्यक्रमातून बाहेर पडताना तिथे चाहत्यांची बरीच गर्दी जमली होती. चाहत्यांच्या गर्दीतून तिला गाडीपर्यंत जाण्यासाठी काहीसा त्रास सहन करावा लागला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका क्षणाला ती चालताना अडखळली, परंतु तिच्या बॉडीगार्डने तिला पडण्यापासून वाचवलं. काहींनी तिला धक्का सुद्धा दिला. समंथाला गाडीत बसवण्यासाठी पोलिसांचीही मदत घ्यावी लागली. यादरम्यान समंथा प्रचंड अस्वस्थ झाली होती. Samantha Ruth Prabhu |
View this post on Instagram
समंथासोबत घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ पाहून चाहते खूप नाराज झाले आहेत. तिला घेरणाऱ्या चाहत्यांना अनेकांनी फटकारलं आहे. सेलिब्रिटींसोबत सेल्फी किंवा फोटो क्लिक करण्यासाठी जे चाहते मर्यादांचंही पालन करत नाहीत, त्यांच्यावर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. Samantha Ruth Prabhu |
दरम्यान, समंथाने 1 डिसेंबर रोजी दिग्दर्शक राज निदिरमोरूशी लग्न केलं. या दोघांनी मिळून ‘द फॅमिली मॅन’ या गाजलेल्या वेब सीरिजचं दिग्दर्शन केलं. राज निदिमोरूचेही हे दुसरं लग्न आहे. त्याने सहाय्यक दिग्दर्शिका श्यामली डे हिच्याशी पहिलं लग्न केलं होतं. Samantha Ruth Prabhu |
हेही वाचा:





