Sunny Leone : बॉलिवूडची बेबी डॉल अडचणीत? 2400 कोटींच्या घोटाळा प्रकरणी CID ची नोटीस
Sunny Leone : या तपासादरम्यान शिवानंद नीलण्णवर यांनी निर्मिती केलेल्या 2023 मधील 'चॅम्पियन' या कन्नड चित्रपटातील आर्थिक व्यवहारही तपासाच्या कक्षेत आले आहेत.

Sunny Leone : बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) हिचं नाव सध्या कर्नाटकमधील एका बहुचर्चित आर्थिक घोटाळ्याच्या तपासात समोर आल्याने खळबळ उडाली आहे. कथित 2400 कोटी रुपयांच्या शिवम असोसिएट्स गुंतवणूक घोटाळा प्रकरणात सीआयडीने सनी लिओनीला नोटीस बजावली आहे. मात्र, तिच्यावर कोणतेही आरोप नसून ही नोटीस केवळ माहिती संकलनासाठी पाठवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. (Sunny Leone)
तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, शिवम असोसिएट्स आणि त्याचे प्रवर्तक शिवानंद नीलण्णवर यांच्यावर बेकायदेशीर गुंतवणूक योजनांच्या माध्यमातून सुमारे चार लाख गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात निधी उभारल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा तपास सध्या सीआयडीकडून सुरू आहे.
हेही वाचा : Dadar BEST Bus Accident : ‘ब्रेक फेल नव्हे, तर….’; दादर बेस्ट बस अपघातात मोठी माहिती समोर
या तपासादरम्यान शिवानंद नीलण्णवर यांनी निर्मिती केलेल्या 2023 मधील ‘चॅम्पियन’ या कन्नड चित्रपटातील आर्थिक व्यवहारही तपासाच्या कक्षेत आले आहेत. या चित्रपटातील ‘डिंगारा बिल्ली नानू’ या लोकप्रिय गाण्यात सनी लिओनीने विशेष भूमिका साकारली होती. या कामासाठी तिला सुमारे 1 कोटी रुपये मानधन देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. (Sunny Leone )

Sunny Leone : बॉलिवूडची बेबी डॉल अडचणीत? 2400 कोटींच्या घोटाळा प्रकरणी CID ची नोटीस
सीआयडी आता या मानधनासाठी वापरण्यात आलेल्या निधीचा स्रोत, तसेच संबंधित आर्थिक व्यवहारांची माहिती तपासत आहे. त्यामुळेच सनी लिओनीला चौकशीसाठी नोटीस पाठवण्यात आली आहे. (Sunny Leone )
अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, सनी लिओनीविरोधात सध्या कोणताही फसवणुकीचा गुन्हा किंवा आरोप नोंदवलेला नाही. तपास यंत्रणेचे लक्ष केवळ कथित गुंतवणूक घोटाळ्याशी संबंधित आर्थिक व्यवहारांची साखळी तपासण्यावर केंद्रित आहे. त्यामुळे या प्रकरणात तिची भूमिका साक्षीदार किंवा माहिती पुरवणारी व्यक्ती इतकीच असल्याचे मानले जात आहे.





