Irani Cup 2024 (MUM vs ROI, Stumps on Day 4) : शेष भारताचा डाव 416 धावांमध्ये संपुष्टात, दुसऱ्या डावात दिवसअखेर मुंबईची 4 बाद 153 पर्यंत मजल…

Irani Cup 2024 (MUM vs ROI, Stumps on Day 4) : – तिसऱ्या दिवशी नाबाद असलेल्या अभिमन्यू ईश्वरन व ध्रुव जुरेल हे दोघे बाद झाल्यानंतर शेष भारत संघाचा डाव 416 धावांमध्ये संपुष्टात आला. त्यानंतर मुंबई संघाचा डाव देखील कोसळला. मात्र प्रथ्वी शॉने जिगरबाज खेळी करताना संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दिवसअखेर मुंबई संघाने 40 षटकांत 4 बाद 153 धावांपर्यंत मजल मारली होती.
गुरुवारी नाबाद असणाऱ्या शेष भारत संघाचे अभिमन्यू ईश्वरन व ध्रुव जुरेल यांनी खेळायला सुरुवात केली. सकाळच्या सत्रात ध्रुव जुरेलने अर्धशतक पूर्ण केले. यावेळी ईश्वरनची द्विशतकाकडे वाटचाल सुरु होती. मात्र संघाच्या 393 धावा झाल्या असताना ध्रुव जुरेल 93 धावांची खेळी करून परतला.
Stumps on Day 4!
A thrilling day’s play!
Saransh Jain led Rest of India’s fightback with 4 wickets.
Mumbai are 153/6 in their 2nd innings, leading by 274.
We are in for an exciting final day’s play!#IraniCup | @IDFCFIRSTBank
Follow the match ▶️ https://t.co/Er0EHGOZKh pic.twitter.com/Ms3d1rgpZc
— BCCI Domestic (@BCCIdomestic) October 4, 2024
त्यानंतर लगेचच ईश्वरन देखील 191 धावांची खेळी करून परतला. दोघे बाद झाल्यानंतर मात्र, शेष भारत संघाचा डाव गडगडला. तनुष कोटियन व शम्स मुलाणी यांनी प्रत्येकी 3, मोहित अवस्थीने 3 तर मोहम्मद जुनेद खानने 1 गडी बाद केला.
पहिल्या डावात 121 धावांची आघाडी मिळाल्यानंतर मुंबई संघाने दुसऱ्या डावाला सुरुवात केली. सलामीवीर पृथ्वी शॉ व आयुष्य म्हात्रे (14) यांनी 52 धावांची सलामी दिल्यानंतर मुंबई संघाचा डाव गडगडला. हार्दिक तामोरे (7), कर्णधार अजिंक्य रहाणे (9), श्रेयस अय्यर (8) व शम्स मुलाणी (०) हे झटपट परतले. त्यामुळे मुंबई संघाची अवस्था 4 बाद 115 अशी झाली. पृथ्वी शॉने 76 धावांची खेळी करताना एकाकी झुंज दिली. दिवसअखेर मुंबईचे सर्फराज खान (9) व तनुष कोटियन (20) खेळात होते. मुंबई संघाकडे चौथ्या दिवसअखेर 274 धावांची आघाडी आहे.





