Irani Cup 2024 (MUM vs ROI, Stumps on Day 3) : मुंबईचा डाव 537 धावांवर संपुष्टात, प्रत्युत्तरात शेष भारत संघाचेही चोख प्रत्युत्तर….

Irani Cup 2024 (MUM vs ROI, Stumps on Day 3) :- मुंबईच्या विशाल धावसंख्येयला शेष भारत संघाने 4 बाद 289 धावा करताना चोख प्रत्युत्तर दिले. शेष भारतच्या अभिमन्यू ईश्वरनने नाबाद 151 धावांची खेळी करताना शेष भारत संघाला सुस्थितीत आणले. काल मुंबईच्या सर्फराज खानने धडाकेबाज द्विशतकी खेळी केली होती. आज तिसऱ्या दिवशी मुंबई संघाचा डाव 141 षटकांत सर्व बाद 537 धावांवर संपुष्टात आला.
सर्फराज खान 222 धावा करून नाबाद राहिला. शेष भारत संघा (रेस्ट ऑफ इंडिया) कडून मुकेश कुमार याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तर यश दयाल आणि प्रसिध कृष्णा या दोघांच्या खात्यात 2-2 विकेट्स गेल्या. तर सारांश जैनने 1 विकेट घेतली. मुंबईच्या विशाल धावसंख्येसमोर शेष भारत संघाची सुरुवात चांगली झाली नाही. कर्णधार ऋतुराज गायकवाड 9 धावा करून झटपट बाद झाला. ऋतुराज व अभिमन्यू ईश्वरन यांनी 40 धावांची सलामी दिली.
Another action-packed day!
Rest of India move to 289/4 on the back of a splendid 151* from Abhimanyu Easwaran.
They trail by 248 runs with Easwaran & Dhruv Jurel (30*) at the crease.#IraniCup | @IDFCFIRSTBank
Follow the match ▶️ https://t.co/Er0EHGOZKh pic.twitter.com/bReWj4aeaH
— BCCI Domestic (@BCCIdomestic) October 3, 2024
त्यानंतर अभिमन्यू ईश्वरनने साई सुदर्शनसोबत 87, देवदत्त पडिक्कल सोबत 31 तर ईशान किशन सोबत 70 धावांची भागीदारी केली. चांगली सुरुवात मिळाल्यानंतर देखील साईसुदर्शन 32, देवदत्त पडिक्कल 16 व ईशान किशन 38 धावांची खेळी करून बाद झाले. दरम्यान अभिमन्यू ईश्वरनने 117 चेंडूत 100 धावांचा टप्पा गाठला.
IND vs BAN : कसोटी मालिका संपली! आता सुरू होणार टी-20 चा थरार; जाणून घ्या कधी-कुठे होणार सामने?
त्यानंतर अभिमन्यू ईश्वरनने ध्रुव जुरेल सोबत 61 धावांची भागीदारी करताना आपला 150 धावांचा टप्पा गाठला. दिवसअखेर अभिमन्यू ईश्वरन 151 (12 चौकर, 1 षटकार) तर ध्रुव जुरेल 30 धावांवर नाबाद राहिले. मुंबई संघाकडून मोहित अवस्थीने 2 तर मोहम्मद जुनेद खान व तनुष कोटियन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.





