IPL Ranked Third : IPL ला मोठा झटका! जगातील सर्वोत्तम लीगच्या शर्यतीत तिसऱ्या क्रमांकावर घसरण; ‘या’ लीगने मारली बाजी, पाहा संपूर्ण यादी
IPL Ranked Third : वर्ल्ड क्रिकेट असोसिएशनच्या (WCA) रँकिंगमध्ये आयपीएलला अनपेक्षित निकालाचा सामना करावा लागला आहे.

IPL Ranked Third in WCA Ranking : जगातील सर्वात श्रीमंत आणि ग्लॅमरस क्रिकेट लीग मानल्या जाणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) ला एका ताज्या जागतिक क्रमवारीत मोठा धक्का बसला आहे. ‘वर्ल्ड क्रिकेट असोसिएशन’ (WCA) ने जाहीर केलेल्या टी-२० लीगच्या क्रमवारीत आयपीएलला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले असून, पहिल्या क्रमांकावर असलेल्या नावामुळे क्रिकेट विश्वात आश्चर्य व्यक्त होत आहे.
वर्ल्ड क्रिकेट असोसिएशनच्या (WCA) रँकिंगमध्ये आयपीएलला अनपेक्षित निकालाचा सामना करावा लागला आहे. खेळाडूंचे हित, पेमेंटची विश्वासार्हता आणि आयोजन यांसारख्या निकषांवर आधारित या रेटिंगमध्ये इंग्लंडची ‘द हंड्रेड’ (The Hundred) ७५.२ रेटिंग पॉइंट्ससह पहिल्या क्रमांकावर ठरली आहे. तर दक्षिण आफ्रिकेची ‘SA20’ दुसऱ्या स्थानावर आहे.
आयपीएल का पिछाडली?
IPL Ranked 3rd by World Cricketers' Association
Read more from Sports Tiger and other top sources here: https://t.co/ggydKuxlRl#IPL #Cricket #WCA #PSL #sports pic.twitter.com/JmYXDjuBwr
— Dailyhunt (@DailyhuntApp) March 20, 2026
डब्ल्यूसीएच्या अहवालानुसार, खेळाडूंना दिले जाणारे सरासरी मानधन आणि पेमेंटमधील पारदर्शकता यासाठी आयपीएलला सर्वाधिक गुण मिळाले आहेत. मात्र, आयोजनाचे अधिकार आणि खेळाडूंसोबतचे वाद सोडवण्याच्या क्षेत्रात आयपीएल मागे पडल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. परिणामी, ६२.६ रेटिंग पॉइंट्ससह आयपीएलला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे, ऑस्ट्रेलियाची ‘बिग बॅश लीग’ (BBL) ६२.५ पॉइंट्ससह चौथ्या क्रमांकावर असून आयपीएल आणि बीबीएलमध्ये केवळ एका दशांश गुणाचा फरक आहे.
डब्ल्यूसीए सीईओंचे स्पष्टीकरण –
डब्ल्यूसीएचे सीईओ टॉम मोफॅट यांनी सांगितले की, “जगभरातील लीगमध्ये खेळाडूंच्या सुरक्षेला आणि हिताला प्राधान्य मिळावे, हा आमचा उद्देश आहे. घरगुती लीगनी क्रिकेटच्या विकासात सकारात्मक भूमिका बजावली असली तरी, अनेक ठिकाणी सुधारणेला वाव आहे. सर्व मान्यताप्राप्त लीग यशस्वी व्हाव्यात आणि तिथे खेळाडूंना योग्य संरक्षण मिळावे यासाठी आम्ही हा अहवाल प्रसिद्ध केला आहे.”
जागतिक टी-२० लीग रँकिंग (अव्वल ५):
१. द हंड्रेड (इंग्लंड) – ७५.२
२. SA20 (दक्षिण आफ्रिका) – ६८
३. आयपीएल (भारत) – ६२.६
४. बीबीएल (ऑस्ट्रेलिया) – ६२.५
५. पीएसएल (पाकिस्तान) – ४८





