Yashasvi Jaiswal Record : यशस्वी जैस्वालने क्राइस्टचर्च कसोटीत रचला इतिहास! सचिनला मागे टाकत विश्वविक्रमाला घातली गवसणी
Yashasvi Jaiswal World Record : यशस्वी जैस्वालने न्यूझीलंडविरुद्ध क्राइस्टचर्च कसोटीत मैदानात उतरल्यावर त्याने एका विशेष यादीत सचिन तेंडुलकरला मागे टाकले. या सामन्यात न्यूझीलंडने पहिल्या दिवसअखेर ५ बाद २४६ धावा केल्या आहेत.

Yashasvi Jaiswal surpasses Sachin Tendulkar and equals Sanjay Manjrekar’s world record : भारत आणि न्यूझीलंडमधील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना २७ नोव्हेंबरपासून क्राइस्टचर्चच्या हेगली ओव्हलवर खेळला जात आहे. या सामन्यात कर्णधार शुबमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. स्टार सलामीवीर यशस्वी जैस्वाल क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरताच त्याने एका खास विश्वविक्रमाची बरोबरी केली. पदार्पणानंतर सलग वेगवेगळ्या मैदानांवर कसोटी खेळण्याच्या यादीत त्याने दिग्गज सचिन तेंडुलकरला मागे टाकत संजय मांजरेकरच्या विक्रमाशी बरोबरी साधली.
कारकिर्दीतील ३३ वा कसोटी सामनाही नव्या मैदानावर –
यशस्वी जैस्वालने जुलै २०२३ मध्ये वेस्ट इंडिज दौऱ्यावरील रोसेऊ येथील विंडसर पार्कवर कसोटी पदार्पण केले होते. तेव्हापासून आजवर त्याने आपले सर्व ३३ कसोटी सामने पूर्णपणे वेगवेगळ्या मैदानांवर खेळण्याचा अनोखा पराक्रम केला आहे. यापूर्वी भारताचे माजी खेळाडू संजय मांजरेकर यांनी पदार्पणानंतर सलग ३३ कसोटी वेगवेगळ्या मैदानांवर खेळल्या होत्या. ३४ व्या कसोटीत त्यांचे मैदान पुन्हा आले होते, ज्या विक्रमाची आता यशस्वीने बरोबरी केली आहे.
सचिन तेंडुलकरसह दिग्गजांना मागे टाकत रचला इतिहास –
Yashasvi Jaiswal equals Sanjay Manjrekar’s record for the most different venues played at in Test cricket from debut (33).
#YashasviJaiswal #SanjayManjrekar #Test #India #INDvsNZ https://t.co/DA5TjbCRdF
— CricTracker (@Cricketracker) November 27, 2026
पदार्पणानंतर सलग सर्वाधिक वेगवेगळ्या मैदानांवर कसोटी खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत भारतीय क्रिकेटपटूंचाच दबदबा राहिला आहे. या यादीत संजय मांजरेकर आणि यशस्वी जैस्वाल प्रत्येकी ३३ सामन्यांसह संयुक्तपणे पहिल्या स्थानावर आहेत. यापूर्वी सचिन तेंडुलकरने सलग ३२ कसोटी वेगवेगळ्या मैदानांवर खेळल्या होत्या, ज्याला यशस्वीने मागे टाकले. याशिवाय भारताचा माजी वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथ आणि वेस्ट इंडिजचा दिनेश रामदीन प्रत्येकी २४ सामन्यांसह या यादीत आहेत.
नागपूरमध्ये मांजरेकरांचा विश्वविक्रम मोडणे जवळपास निश्चित –
Yashasvi Jaiswal equals Sanjay Manjrekar’s record for the most consecutive Tests played at different venues since debut! 🇮🇳🌎
Both have featured in 33 consecutive Tests across different venues! 🏏
#NZvIND #Tests #WTC #Sportskeeda https://t.co/DBLhlteW2x
— Sportskeeda (@Sportskeeda) November 26, 2026
न्यूझीलंड दौरा संपवून भारतीय संघ मायदेशी परतल्यानंतर पुढील वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना २१ जानेवारीपासून नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर रंगणार आहे. यशस्वी जैस्वालने आजवर नागपूरमध्ये एकही कसोटी सामना खेळलेला नाही. त्यामुळे तो या सामन्यात मैदानात उतरताच सलग ३४ व्या नव्या मैदानावर खेळत संजय मांजरेकर यांचा विश्वविक्रम मोडणे जवळपास निश्चित आहे.





