Rohit Sharma Reaction : “नीता वहिनी आणि आकाशशी चर्चा झाली अन्…”, पुन्हा मुंबईचा कर्णधार होताच रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया
Rohit Sharma Reaction : मुंबईच्या ऐतिहासिक २० व्या हंगामात सर्वाधिक लोकप्रिय आणि यशस्वी कर्णधार रोहित शर्मा पुन्हा नेतृत्व करणार आहे. याबाबत रोहित शर्मा, नीता अंबानी आणि आकाश अंबानी यांनी काय प्रतिक्रिया दिल्या? जाणून घेऊया.

Rohit Sharma, Nita Ambani, and Akash Ambani share heartfelt reactions : मुंबई इंडियन्सने आगामी आयपीएल २०२७ साठी रोहित शर्माची पुन्हा कर्णधारपदी नियुक्ती केली आहे. मुंबईच्या ऐतिहासिक २० व्या हंगामात सर्वाधिक लोकप्रिय आणि यशस्वी कर्णधार पुन्हा नेतृत्व करणार आहे. यानंतर रोहित म्हणाला, “मुंबई इंडियन्स माझ्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग असून नेतृत्व करणे नेहमीच अभिमानाचे राहिले आहे. नीता वहिनी व आकाश यांच्याशी झालेली चर्चा उत्साहित करणारी होती. एकत्रित यशावर माझा पूर्ण विश्वास आहे.”
पलटनला अविस्मरणीय क्षण देण्याचे रोहितचे लक्ष्य –
आगामी हंगामातील आव्हानांबाबत सज्ज असल्याचे सांगताना रोहितने आपल्या खेळाच्या रणनीतीवर भाष्य केले. तो पुढे म्हणाला, “मुंबई इंडियन्सच्या २० व्या हंगामासाठी आणि आगामी आव्हानांसाठी मी सज्ज आहे. आपल्या पलटनला आनंद साजरा करण्यासाठी अनेक अविस्मरणीय क्षण देण्याचे माझे लक्ष्य आहे. आपली खेळण्याची शैली कायम ठेवणे, एक संघ म्हणून प्रतिस्पर्ध्यांचा सामना करणे आणि खेळाचा आनंद घेणे यावर आमचा भर असेल.”
२०११ पासूनचा प्रवास अभिमानास्पद: नीता अंबानी
Smile, everybody smile 💙
#MumbaiIndians #CaptainRo https://t.co/YUqYZTQxu9
— Mumbai Indians (@mipaltan) November 27, 2026
मुंबई इंडियन्सच्या मालक नीता अंबानी यांनी रोहितच्या पुनरागमनावर आनंद व्यक्त केला. त्या म्हणाल्या, “२०११ मध्ये आम्ही रोहितसाठी बोली लावली, तेव्हापासून तो मुंबई इंडियन्स कुटुंबाचा भाग बनला. संघात आलेला तो तरुण रोहित मला आजही आठवतो. गेल्या काही वर्षांत त्याची क्रिकेटपटू, विजेता, नेता आणि एक उत्तम कुटुंबवत्सल व्यक्ती म्हणून झालेली प्रगती पाहणे आमच्यासाठी आनंदाचा व अभिमानाचा क्षण राहिला आहे.”
नव्या अध्यायासाठी चाहत्यांसह अंबानी कुटुंबाच्या शुभेच्छा –
“We bid for Rohit in 2011, and from that moment, he became part of our Mumbai Indians family.
I still remember the young Rohit who joined us, and it has been such a joy and privilege to watch him grow over the years as a cricketer, a champion, a leader, and a wonderful family man.
As we celebrate the 20th season of Mumbai Indians, it is a very special moment for all of us to see Rohit lead the team once again. He has given us so many wonderful memories over the years, and I know how much he means to our Paltan.
I hope this new chapter brings many more moments of pride for him, for our team and for the millions of fans who love Mumbai Indians. Rohit, we are all cheering for you!”
– Mrs. Nita M. Ambani
— Mumbai Indians (@mipaltan) November 27, 2026
ऐतिहासिक हंगामाचे महत्त्व अधोरेखित करताना नीता अंबानी पुढे म्हणाल्या, “मुंबईच्या २० व्या हंगामात रोहित पुन्हा नेतृत्व करणार, हा अत्यंत खास क्षण आहे. त्याने आम्हाला अनेक अविस्मरणीय क्षण दिले. पलटनसाठी तो किती महत्त्वाचा आहे हे मला ठाऊक आहे. हा नवा अध्याय त्याच्यासाठी, संघासाठी आणि लाखो चाहत्यांसाठी अभिमानाचे क्षण घेऊन येईल, अशी आशा आहे. रोहित, आम्ही सर्वजण तुझ्यासाठी चिअर करत आहोत!”
रोहितचा अनुभव आणि दमदार संघाकडून मोठ्या अपेक्षा –
“I am delighted to have Rohit lead the Blue and Gold into our landmark 20th season.
The bond that Rohit shares with Mumbai Indians and our Paltan is truly special. In our conversations about the season ahead, there was a shared sense of excitement and ambition for what we can achieve together.
With Rohit’s experience and leadership, and the exciting team we are building, there is so much to look forward to. We want to play the kind of cricket that makes our Paltan proud and create many more special memories together.”
– Akash Ambani
— Mumbai Indians (@mipaltan) November 27, 2026
मुंबई इंडियन्सचे मालक आकाश अंबानी यांनीही आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, “ऐतिहासिक २० व्या हंगामात रोहित नेतृत्व करणार असल्याने खूप आनंद झाला. रोहित आणि पलटनचे नाते खरोखरच खास आहे. आमच्या चर्चांमध्ये उत्साह व महत्त्वाकांक्षा दिसली. त्याचा अनुभव, नेतृत्व आणि दमदार संघामुळे मोठ्या अपेक्षा असून पलटनला अभिमान वाटेल असे क्रिकेट खेळून अनेक अविस्मरणीय क्षण निर्माण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.”





