IPL 2024 (#RRvLSG Match 4) : राहुल-पूरनची अर्धशतके व्यर्थ, लखनौनं जिंकलेला सामना गमावला….

IPL Live Cricket Score, RR vs LSG Indian Premier League 2024 : राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील सामना 24 मार्च रोजी सवाई मानसिंग स्टेडियम, जयपूर येथे खेळला गेला. आयपीएल 2024 च्या चौथ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने लखनौ सुपर जायंट्सचा 20 धावांनी पराभव केला. विजयासाठी 194 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या लखनौ संघाने सुरुवातीलाच अधिक विकेट गमावल्या, त्यामुळे त्यांना 20 षटकात 6 बाद केवळ 173 धावसंख्येपर्यतच मजल मारता आली.
केएल राहुल आणि निकोलस पूरन यांच्यातील 85 धावांच्या भागीदारीने सामना रोमांचक झाला होता. केएल राहुलने 44 चेंडूत 58 आणि निकोलस पुरनने 41 चेंडूत नाबाद 64 धावा केल्या. पूरण शेवटपर्यंत क्रीजवर राहिला, मात्र संदीप शर्मा आणि आवेश खानच्या धारदार गोलंदाजीने राजस्थानचा विजय निश्चित केला.
लखनौला शेवटच्या 3 षटकात 42 धावांची गरज होती, परंतु 18 व्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी आलेल्या रविचंद्रन अश्विनने मार्कस स्टॉइनिसची विकेट घेत सामन्याचा मार्ग बदलला. त्याला केवळ 3 धावा करता आल्या. या षटकात अश्विनने फक्त 4 धावा दिल्या. बाकी काम संदीप शर्माने 19 व्या षटकात केलं. 19 वे षटक अत्यंत महत्त्वाचे मानले जाते आणि अशा परिस्थितीत संदीपने केवळ 11 धावा देऊन सामना राजस्थानच्या झोळीत टाकला होता.
विशेषत: 20 व्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी आलेल्या आवेश खानने खूप प्रभावित केले, ज्याने क्रीजवर टिकलेल्या निकोलस पूरनलाही हात उघडण्याची संधी दिली नाही. आवेशने शेवटच्या षटकात केवळ 6 धावा दिल्या. लखनौला शेवटच्या सहा चेंडूंवर विजयासाठी 27 धावांची गरज होती, पण संघाला केवळ सहा धावा करता आल्या. त्यावेळी निकोलस पूरन आणि कृणाल पंड्या क्रीजवर होते. आवेश खान गोलंदाजीसाठी आला होता, जो गेल्या मोसमात लखनौकडून खेळला होता. मात्र, त्याने आपल्या जुन्या संघाला केवळ सहा धावा करू दिल्या. के.ल. राहुल आणि निकोलस पूरन यांची अर्धशतके व्यर्थ गेली. या दोघां व्यतिरिक्त अन्य फलंदाज फ्लाॅप ठरले. क्विंटन डी कॉक 4, आयुष बडोनी 1, दीपक हुडा 26, मार्कस स्टॉइनिस 3 धावांवर बाद झाले. तर देवदत्त पडिक्कल शून्यावरच माघारी परतला.
राजस्थानचे खेळाडू गोलंदाजीत थोडे सरस ठरले. ट्रेंट बोल्टला एका षटकात मार बसला असला तरी त्याने 4 षटकांत 35 धावा देत 2 महत्त्वाचे बळी घेतले. अश्विन आणि संदीप शर्मा यांनीही अखेरच्या षटकांमध्ये अत्यंत तगडी गोलंदाजी करत राजस्थानच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. तर 19व्या षटकात संदीप शर्माने केवळ 11 धावा देत राजस्थान रॉयल्सचा विजय जवळपास निश्चित केला. आवेश खानने शेवटच्या षटकात कसून गोलंदाजी केली. आवेशने सामन्यात 3 षटकात केवळ 21 धावा दिल्या. गोलंदाजीत बोल्टनं सर्वाधिक 2 तर अश्विन,चहल, संदीप आणि बर्गर यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
.@rajasthanroyals start on the right note ✅
Record a convincing win and earn the important 2️⃣ points courtesy Captain Sanju Samson
Scorecard ➡️ https://t.co/MBxM7IvOM8#TATAIPL | #RRvLSG pic.twitter.com/jLkRYD0j7D
— IndianPremierLeague (@IPL) March 24, 2024
तत्पूर्वी, राजस्थानचा कर्णधार सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या राजस्थान संघाची सुरुवात खराब झाली.
राजस्थान रॉयल्सकडून यशस्वी जैस्वाल आणि जोस बटलरने डावाची सुरुवात केली. बटलरने 9 चेंडूत 22 धावा केल्या, मात्र दुसऱ्याच षटकात नवीन-उल-हकच्या चेंडूवर तो बाद झाला. जैस्वालनेही आपल्या छोट्या खेळीत 3 चौकार आणि 1 षटकार लगावला. त्याने 200 च्या स्ट्राईक रेटने 12 चेंडूत 24 धावा केल्या, पण त्याला मोठी खेळी खेळता आली नाही. संघाची धावसंख्या 49 धावांत 2 विकेट्स अशी होती, पण त्यानंतर कर्णधार संजू सॅमसन आणि रायन पराग यांच्यात 93 धावांची उत्कृष्ट भागीदारी झाली. रियान परागने 29 चेंडूंच्या खेळीत 1 चौकार आणि 3 षटकारांसह 43 धावा केल्या. परागला नवीन-उल-हकनं झेलबाद केलं.
शिमरॉन हेटमायर अपेक्षित खेळी करू शकला नाही, तो पाच धाव काढून माघारी परतला. त्याला रवि बिश्नोईनं राहुलकरवी झेलबाद केल, पण नुकतेच भारताकडून कसोटी पदार्पण करणाऱ्या ध्रुव जुरेलने कर्णधार सॅमसनला चांगली साथ दिली. सॅमसनने 52 चेंडू खेळताना नाबाद 82 धावा केल्या आणि या खेळीत त्याने 3 चौकार आणि 6 षटकार मारले. तर जुरेलने 12 चेंडूत नाबाद 20 धावा केल्या. अशाप्रकारे राजस्थानचा संघाने 20 षटकात 4 गडी गमावताना 193 धावांपर्यंत मजल मारण्यात यशस्वी ठरला.
15 व्या षटकापर्यंत, राजस्थान सुमारे 9.5 च्या रन रेटने खेळत होता, जिथे संघ 210 ते 215 धावांची धावसंख्या गाठू शकेल असे वाटत होते. मात्र त्यानंतर लखनौच्या गोलंदाजांनी चांगली लय कायम ठेवत राजस्थानला 193 धावांपर्यंत रोखले.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/ipl-2024-cskvrcb-match-1-learned-match-finishing-from-ms-dhoni-shivam-dubey/
नवीन-उल-हकने लखनौसाठी चांगली गोलंदाजी करत 2 महत्त्वाचे बळी घेतले. त्याने 4 षटकात 41 धावा दिल्या, तर कृणाल पांड्याने 4 षटकांत 19 धावा देत एकही बळी घेतला नसला तरी त्याने आपल्या तगड्या गोलंदाजीने प्रभावित केले. मोहसीन खान आणि रवी बिश्नोई यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.





