Vaibhav Sooryavanshi Celebration : अर्ध्या तासातच उघडं झालं वैभवच्या सेलिब्रेशनचं गुपित; कोच रोमी भिंडरच्या प्रश्नावर झाला भावूक! पाहा VIDEO
Vaibhav Sooryavanshi Celebration : अवघ्या २३ चेंडूंत अर्धशतक झळकावल्यानंतर वैभवने प्रेक्षकांकडे पाहत हाताने 'A' अक्षर तयार करत एक अनोखे सेलिब्रेशन केले, ज्याची सर्वत्र चर्चा आहे.

Vaibhav Sooryavanshi opens up about the celebration : लखनौने दिलेल्या २२१ धावांच्या अवाढव्य आव्हानाचा पाठलाग करताना वैभवने अवघ्या ३८ चेंडूंत ९३ धावांची वादळी खेळी केली. या खेळीत त्याने ७ चौकार आणि १० गगनचुंबी षटकार ठोकले. शतकाच्या उंबरठ्यावर असताना तो मोहसिन खानच्या चेंडूवर बाद झाला, पण तोपर्यंत त्याने राजस्थानचा विजय निश्चित केला होता. मात्र, सध्या त्याच्या या खेळीपेक्षा त्याने केलेल्या एका ‘गुप्त’ सेलिब्रेशनची चर्चा रंगली आहे.
अर्धशतकानंतर केला ‘A’ चा इशारा – (Vaibhav Sooryavanshi Celebration )
सामन्यादरम्यान अवघ्या २३ चेंडूंत अर्धशतक झळकावल्यानंतर वैभवने प्रेक्षकांकडे पाहत हाताने ‘A’ अक्षर तयार करत एक अनोखे सेलिब्रेशन केले. या इशाऱ्याचा अर्थ कोणालाच समजत नव्हता. अनेकांनी याचे वेगवेगळे तर्क लावले. काही चाहत्यांच्या मते, नुकतीच भारतीय संघात निवड झाल्यामुळे वैभवने मुख्य निवडकर्ता अजित आगरकर (Ajit Agarkar) यांना उत्तर देण्यासाठी हा ‘A’ चा इशारा केला असावा. पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये जेव्हा समालोचक मुरली कार्तिकने या सेलिब्रेशनचा अर्थ विचारला, तेव्हा वैभवने प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न केला. “यात काही विशेष अर्थ नव्हता, मी प्रत्येक सामन्यात काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतो,” असे सांगत त्याने सत्य लपवले.
An entertainer on the field and even off it 😄
That’s Vaibhav Sooryavanshi for you 😌
Scorecard ▶️ https://t.co/LvQzM3tl06 #TATAIPL | #KhelBindaas | #RRvLSG | @rajasthanroyals pic.twitter.com/XO3ZKPPJWb
— IndianPremierLeague (@IPL) May 19, 2026
वैभव सूर्यवंशीने कोचसमोर केला खुलासा – (Vaibhav Sooryavanshi Celebration)
View this post on Instagram
मुरली कार्तिकसमोर सेलिब्रेशनला कोणताही अर्थ नसल्याचे सांगणाऱ्या वैभवला अर्ध्या तासातच आपल्या कोचसमोर मात्र सत्य लपवता आले नाही. सामन्यानंतर राजस्थान रॉयल्सचे कोच रोमी भिंडर यांनी जेव्हा वैभवला गाठले आणि थेट विचारले की, “तू हे सेलिब्रेशन कोणासाठी केले आणि यामागचे खरे कारण काय होते?” तेव्हा वैभवला भावना अनावर झाल्या.
हेही वाचा – RR vs LSG : राजस्थानचा लखनऊवर रॉयल विजय; मिचेल मार्शची खेळी व्यर्थ
कोचच्या प्रश्नावर प्रामाणिकपणे उत्तर देताना वैभव सूर्यवंशी भावूक झाला. तो म्हणाला, “मला हे कोणालाही सांगायचे नव्हते, कारण ही माझी अत्यंत वैयक्तिक (पर्सनल) गोष्ट होती. पण, हे सेलिब्रेशन मी माझ्या आईसाठी (Anima) केले होते.” वैभवचे हे भावनिक उत्तर ऐकल्यानंतर आता सोशल मीडियावर त्याचे कौतुक होत असून, अवघ्या १५ वर्षांच्या या मुलाची आपल्या आईप्रती असणारी निष्ठा चाहत्यांची मने जिंकत आहे.





