IPL 2025 : आयपीएल फ्रेंचायची नव्या नियमांवर नाराज, बीसीसीआयला लिहलं पत्र…

IPL franchises unhappy with new RTM clause :- आयपीएल मेगा लिलावाच्या नियमांमध्ये झालेल्या बदलामुळे अनेक संघ फ्रेंचायजी खूश नाहीत. सर्वात मोठा वाद राईट टू मॅच नियमातील बदलाबाबत आहे. काही संघांनी बीसीसीआयला पत्र लिहून आपला आक्षेपही व्यक्त केला आहे.
बीसीसीआयने 28 सप्टेंबर रोजी लीगचे नवीन धारणा धोरण लागू केले होते, ज्यामध्ये राईट टू मॅच कार्ड नियम परत करण्यात आला होता. या नियमानुसार, जर संघाला एखाद्या खेळाडूला रिटेन करता येत नसेल, तर ते राईट टू मॅच कार्ड वापरून मेगा लिलावात त्याला कायम ठेवू शकतील. मात्र, यामध्ये एक बदल करण्यात आला आहे जो संघांना आवडला नाही.
Women’s T20 World Cup 2024 : टीम इंडियानं पुन्हा मारलं मैदान, पाकचा 6 विकेट्स राखून केला पराभव…
समजा, रोहित शर्माला मुंबई इंडियन्सने रिटेन केले नाही. लिलावात त्याचे नाव पुढे आले आणि त्याला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 10 कोटी रुपयांना विकत घेतले. आता मुंबईला हवे असल्यास आरटीएम कार्ड वापरून रोहितला 10 कोटींमध्ये ठेवू शकते, हाच नियम फ्रेंचायजींना रुचलेला दिसत नाही.





