PBKS Poor Fielding : “हातातला माईक फेकून द्यावा वाटतोय…”, पंजाबच्या खराब क्षेत्ररक्षणावर रिकी पॉन्टिंग संतापले, पाहा VIDEO
PBKS Poor Fielding : सर्वात वाईट अवस्था फिरकीपटू युझवेंद्र चहलची झाली. त्याच्या गोलंदाजीवर हेनरिक क्लासेन आणि इशान किशनचे सोपे झेल सुटले.

Ricky Ponting Angry on PBKS Poor Fielding : आयपीएल २०२६ (IPL 2026) मध्ये पंजाब किंग्सच्या (PBKS) संघाला पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षणाचा फटका बसला आहे. हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात पंजाबच्या खेळाडूंनी इतके सोपे झेल सोडले की, संघाचे मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग यांना आपला राग अनावर झाला. संघाच्या या चुकांमुळे हैदराबादच्या फलंदाजांनी धावांचा डोंगर उभा केला आणि पंजाबला ३३ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
लाईव्ह इंटरव्ह्यूमध्ये पॉन्टिंगचा संताप – (PBKS Poor Fielding)
सामन्याच्या १० व्या षटकादरम्यान रिकी पॉन्टिंग ब्रॉडकास्टरला लाईव्ह मुलाखत देत होते. त्याचवेळी मैदानात एकापाठोपाठ एक सोपे झेल सुटले. कूपर कॉनोली, शशांक सिंग आणि लॉकी फर्ग्युसन यांनी दिलेले जीवनदान पाहून पॉन्टिंग संतापले. “हे पाहून मला हातातला माईक मैदानात फेकून द्यावासा वाटतोय,” अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. पॉन्टिंग यांनी खेळाडूंना वारंवार सूचना देऊनही मैदानात त्याचा काहीच परिणाम दिसला नाही.
Shashank Singh drops another catch. Never seen this much consistency in dropping catches, man. PBKS is giving tough competition to Pakistan in terms of dropping catches 😂
Look at Ricky Ponting’s reaction in the dugout, bro looked really frustrated 😭pic.twitter.com/cTAu3zeFUO
— TEJASH (@Tejashyyyyy) May 6, 2026
युझवेंद्र चहल क्षेत्ररक्षकांसमोर टेकले गुडघे – (PBKS Poor Fielding)
सर्वात वाईट अवस्था फिरकीपटू युझवेंद्र चहलची झाली. त्याच्या गोलंदाजीवर हेनरिक क्लासेन आणि इशान किशनचे सोपे झेल सुटले. इतकेच नाही तर यष्टीरक्षक प्रभसिमरन सिंगने स्टंपिंगची सोपी संधीही गमावली. या चुकांमुळे हतबल झालेला चहल मैदानातच गुडघ्यावर बसला आणि डोके धरून आपली हतबलता व्यक्त केली. रिकी पॉन्टिंग यांनी सामन्यानंतर स्पष्ट केले की, आदल्या रात्री फ्लडलाईट्समध्ये विशेष सराव करूनही अशा चुका स्वीकारार्ह नाहीत.
शशांक सिंगचा खराब फॉर्म अन् हैदराबादचा विजय –
पंजाबसाठी शशांक सिंगचे खराब क्षेत्ररक्षण ही चिंतेची बाब ठरली आहे. दुखापतीतून परतल्यानंतर गेल्या तीन सामन्यांत त्याने तब्बल पाच झेल सोडले आहेत. हैदराबादच्या फलंदाजांनी या संधींचे सोने केले. इशान किशनने ५५ धावांची खेळी केली, तर क्लासेनने अवघ्या ३२ चेंडूत अर्धशतक झळकावत संघाची धावसंख्या २३५ पर्यंत नेली. प्रत्युत्तरात पंजाबचा संघ ७ बाद २०२ धावाच करू शकला.





