IPL 2026 Mini Auction : आयपीएल लिलावासाठी ‘परदेशवारी’ कायम! ‘या’ देशात पार पडणार IPL 2026 चा लिलाव

परदेशात तिसरा लिलाव –
यापूर्वी आयपीएल २०२४ साठी झालेला मिनी लिलाव दुबईत आयोजित करण्यात आला होता, जो भारताबाहेर झालेला पहिला लिलाव होता. त्यानंतर आयपीएल २०२५ साठीचा मेगा लिलाव दोन दिवस जेद्दाह येथे पार पडला होता. यावर्षी मिनी लिलाव होणार असल्याने तो नेहमीप्रमाणे एका दिवसाचाच असेल.
खेळाडूंच्या रिटेन्शन आणि रिलीझची अंतिम मुदत –
लिलावापूर्वी, सर्व फ्रेंचायझींना १५ नोव्हेंबर रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी तीन वाजेपर्यंत रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी आयपीएलकडे सुपूर्द करावी लागेल. यानंतर, नोंदणीकृत खेळाडूंचा पूल पाठवला जाईल, त्यातून खेळाडूंना शॉर्टलिस्ट केले जाईल आणि नंतर अंतिम लिलाव पूल तयार केला जाईल.
हेही वाचा – Mohammed Shami : मोहम्मद शमीसाठी ‘या’ दोन संघांत रस्सीखेच! सनरायझर्स हैदराबाद ‘कॅश डील’मध्ये करणार ट्रेड
आयपीएलची ट्रेडिंग विंडो सक्रिय –
आयपीएल २०२५ हंगामानंतर सुरू झालेली ‘ट्रेडिंग विंडो’ लिलावाच्या एक आठवडा आधीपर्यंत खुली राहील आणि त्यानंतर २०२६ मध्ये आयपीएल सुरू होण्याच्या तारखेपासून एक महिना आधीपर्यंत सुरू राहील. १० फ्रेंचायझी २०२६ च्या लिलावात खरेदी केलेल्या कोणत्याही खेळाडूला ट्रेड करू शकणार नाहीत. गुरुवारी, पाच वेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्सने शार्दुल ठाकूर आणि शेरफेन रदरफोर्ड या दोन खेळाडूंना ट्रेड केले आहे.
हेही वाचा – MS Dhoni : धोनीची धमाकेदार कमबॅक तयारी! निवृत्तीच्या अफवा संपल्या, IPL 2026 साठी रांचीमध्ये गाळतोय घाम
- मुंबईने शार्दुल ठाकूला २ कोटी रुपयांमध्ये लखनऊ सुपर जाएंट्सकडून ट्रेड केले. शार्दुल मुंबईसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळतो.
- तसेच, मुंबईने वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू शेरफेन रदरफोर्डला गुजरात टायटन्सकडून २.६० कोटी रुपयांमध्ये ट्रेड केले आहे.





