IPL 2026 Key Players : IPL 2026 चा ‘मॅच विनर’ कोण? धोनीच्या ताफ्यात संजूची एन्ट्री तर RCB मध्ये अय्यरचा जलवा; पाहा १० संघांचे शिलेदार!
IPL 2026 Key Players : दाच्या हंगामात अनेक खेळाडूंच्या बदल्या झाल्या असून, काही नवीन चेहरे संघाचे नशीब बदलण्यासाठी सज्ज आहेत.

IPL 2026 Key Players to Watch : आयपीएल २०२६ चे बिगुल वाजले असून २८ मार्च रोजी गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यातील लढतीने हंगामाची सुरुवात होईल. यंदाच्या हंगामात अनेक खेळाडूंच्या बदल्या झाल्या असून, काही नवीन चेहरे संघाचे नशीब बदलण्यासाठी सज्ज आहेत.
बड्या संघांचे ‘गेम चेंजर’ खेळाडू –
चेन्नई सुपर किंग्स (CSK): यंदा चेन्नईच्या ताफ्यात सर्वात मोठे आकर्षण ठरेल तो म्हणजे संजू सॅमसन. टी-२० विश्वचषकातील जबरदस्त फॉर्म पाहता, धोनीच्या मार्गदर्शनाखाली संजू चेन्नईची फलंदाजी अधिक भक्कम करेल.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB): आरसीबीने यावेळी व्यंकटेश अय्यरवर विश्वास दाखवला आहे. मधल्या फळीत तो संघासाठी मोठी भूमिका बजावू शकतो.
कोलकाता नाइट रायडर्स (KKR): केकेआरने कॅमेरून ग्रीनवर२५.२० कोटी मोठी बोली लावली असली तरी, अवघ्या २ कोटींत मिळालेला न्यूझीलंडचा फिन ॲलन ‘तुरुपचा एक्का’ ठरू शकतो. विश्वचषकात ३३ चेंडूत शतक ठोकणारा ॲलन केकेआरला स्फोटक सुरुवात करून देईल.
राजस्थान रॉयल्स: गेल्या वर्षी फिरकीची उणीव भासली होती, जी यंदा रवी बिश्नोई भरून काढू शकतो. तसेच युवा वैभव सूर्यवंशीवरही सर्वांच्या नजरा असतील.
मुंबई इंडियन्स: गुजरात टायटन्सकडून ट्रेड झालेला वेस्ट इंडिजचा फलंदाज शरफेन रदरफोर्ड मुंबईच्या मधल्या फळीला ताकद देईल.
लखनऊ सुपर जायंट्स (LSG): लखनऊने जॉश इंग्लिसला ८.६० कोटींत खरेदी केले असून, तो ऋषभ पंत आणि निकोलस पूरन यांच्यासोबत फलंदाजीची धुरा सांभाळेल.
दिल्ली कॅपिटल्स: दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी दिल्लीच्या गोलंदाजीचे नेतृत्व करेल. टी-२० मधील त्याचे व्हेरिएशन्स संघासाठी फायदेशीर ठरतील.
इतर संघांची रणनीती –
हैदराबादसाठी स्मरण रविचंद्रन, पंजाबसाठी मिचेल ओवन आणि गुजरातसाठी जेसन होल्डर हे खेळाडू यंदा ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची शक्यता आहे. ३१ मे रोजी कोणाच्या डोक्यावर विजेतेपदाचा मुकुट चढणार, हे या खेळाडूंच्या कामगिरीवर अवलंबून असेल.





