IPL 2025 Tanmay Srivastava : विराटचा अंडर-१९ विश्वचषकातील सहकारी आयपीएलमध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज! कोण आहे? जाणून घ्या

Who is Tanmay Srivastava returning as an umpire in IPL 2025 : भारताला अंडर-१९ विश्वचषक जिंकून देणारा तन्मय श्रीवास्तव आता पुनरागमन करण्यास सज्ज आहे. २००८ मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने दक्षिण आफ्रिकेला हरवून विजय मिळवला. या काळात, डावखुऱ्या फलंदाजाने सहा डावांमध्ये २६२ धावा केल्या आणि २००८ च्या १९ वर्षांखालील विश्वचषकात तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. आता तन्मय पंच म्हणून क्रिकेटमध्ये परतण्यास सज्ज आहे.
तन्मय आयपीएलमध्ये पंच म्हणून परतणार –
उत्तर प्रदेशातील कानपूर येथे जन्मलेला तन्मय आयपीएल २०२५ मध्ये पंचगिरी करताना दिसणार आहे. यासह, तो आयपीएलमध्ये खेळण्याव्यतिरिक्त पंच म्हणून काम करणारा पहिला खेळाडू बनेल. ३५ वर्षीय फलंदाज किंग्ज इलेव्हन पंजाब (आता पंजाब किंग्ज) चा भाग होता. तो २००८ आणि २००९ मध्ये या संघाकडून खेळला होता.
२०२० मध्ये घेतली निवृत्ती –
A true player never leaves the field—just changes the game.
Wishing Tanmay Srivastava the best as he dons a new hat with the same passion!#UPCA #IPL #UP #PrideOfUP pic.twitter.com/wrRoW31OG2— UPCA (@UPCACricket) March 17, 2025
२००८ च्या १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या क्रमांकावर ४६ धावांची दमदार खेळी करणारा तन्मय श्रीवास्तव सुमारे पाच वर्षांपूर्वी खेळातून निवृत्त घेतली आहे. उत्तर प्रदेशकडून खेळताना त्याने ९० प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ४९१८ धावा केल्या आहेत. त्याने लिस्ट ए सामन्यांमध्ये १७२८ धावा केल्या आहेत. त्याचप्रमाणे तन्मयने ३४ टी-२० सामन्यांमध्ये ६४९ धावा केल्या आहेत.
हेही वाचा – IPL 2025 : ‘या’ गोलंदाजाचा सामना करताना ख्रिस गेलचे पाय थरथर कापायचे; के. श्रीकांतचे मोठे वक्तव्य
आयपीएलमध्ये या संघांसाठी खेळलाय तन्मय –
तन्मय किंग्ज इलेव्हन पंजाब (आता पंजाब किंग्ज), कोची टस्कर्स आणि डेक्कन चार्जर्स या तीन आयपीएल संघांचा सदस्य होता. परंतु, त्याची आयपीएल कारकीर्द अपेक्षेनुसार राहिली नाही. तो फक्त ७ सामने खेळू शकला. तन्मयला उत्तर प्रदेश आणि आयपीएलमध्ये अपेक्षेनुसार कामगिरी करता आली नाही. आता तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये पंचाची भूमिका बजावत आहे, तर यावेळी त्याला बीसीसीआयने पंच म्हणून निवडले आहे. याची अधिकृत घोषणा यूपीसीएने केली आहे. आता तो आयपीएलमध्ये खेळणारा आणि पंचगिरी करणारा पहिला खेळाडू बनणार आहे.





