SRH vs RR Riyan Parag : रियान परागने रचला इतिहास! श्रेयस अय्यरला मागे टाकत ‘हा’ पराक्रम करणारा ठरला IPL इतिहासातील चौथाच खेळाडू

IPL 2025 SRH vs RR Riyan Parag surpasses Shreyas Iyer history : आयपीएल २०२५ मधील दुसरा सामना राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्यात नाणेफेकीसाठी उतरताच रियानने इतिहास रचला. तो श्रेयस अय्यरला मागे टाकत आयपीएलच्या इतिहासातील चौथा सर्वात तरुण कर्णधार बनला आहे. त्याचबरोबर विराट कोहलीच्या खास क्लबमध्ये झाला सामील.
रियान परागने श्रेयस अय्यरला टाकले मागे –
राजस्थान रॉयल्सचा नियमित कर्णधार संजू सॅमसन इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत जखमी झाला होता. या दुखापतीतून तो अद्याप सावरला नसल्याने पहिल्या काही सामन्यात संघाची धुरा रियान परागकडे सोपवण्यात आली आहे. त्याचे वय सध्या २३ वर्षे १३३ दिवस आहे आणि तो पहिल्यांदाच आयपीएलमध्ये कर्णधारपद भूषवत आहे. २०१८ मध्ये आयपीएलमध्ये श्रेयस अय्यरने दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व केले होते. त्यावेळी त्यांचे वय २३ वर्षे १४२ दिवस होते. आता रियानने कर्णधारपदाची सूत्रे स्वीकारलेल्या पहिल्याच सामन्यात अय्यरला मागे टाकले आहे.
First game of Super Sunday 🥳
Which #SRH and #RR players are in your Fantasy XI?🤔
Head to https://t.co/Qx6VzrvUpf and make your team now‼️#TATAIPL | #SRHvRR | @SunRisers | @rajasthanroyals pic.twitter.com/mDcvlug979
— IndianPremierLeague (@IPL) March 23, 2025
विराटने वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी केले होते आरसीबीचे नेतृत्व –
आयपीएलमध्ये सर्वात तरुण कर्णधार होण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. २०११ मध्ये कोहलीने आरसीबीचे कर्णधारपद स्वीकारले. त्यावेळी त्यांचे वय २२ वर्षे १८७ दिवस होते. त्यानंतर २०१३ मध्ये तो आरसीबीचा नियमित कर्णधार बनला आणि त्याच्या नेतृत्वाखाली आरसीबीने २०१६ च्या आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता, परंतु त्यानंतर सनरायझर्स हैदराबादने त्यांचे जेतेपद जिंकण्याचे स्वप्न भंग केले.
आयपीएलमध्ये कर्णधारपद भूषवणारे सर्वात तरुण कर्णधार:
विराट कोहली – २२ वर्षे १८७ दिवस
स्टीव्ह स्मिथ – २२ वर्षे ३४४ दिवस
सुरेश रैना – २३ वर्षे ११२ दिवस
रियान पराग – २३ वर्षे १३३ दिवस
श्रेयस अय्यर – २३ वर्षे १४२ दिवस
हेही वाचा – KKR vs RCB : स्टंपला बॅट लागूनही सुनील नरेन का झाला नाही Hit Wicket? नेमका काय आहे नियम? जाणून घ्या
रियान दिग्गज खेळाडूंच्या यादीत झाला सामील –
रियान पराग आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व करणारा सातवा खेळाडू ठरला. त्याच्या आधी संजू सॅमसन, शेन वॉर्न, राहुल द्रविड, स्टीव्ह स्मिथ, अजिंक्य रहाणे आणि शेन वॉटसन यांनी राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व केले आहे. राजस्थानने आतापर्यंत फक्त एकदाच जेतेपद जिंकले आहे आणि ते २००८ मध्ये शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली होते.





