IPL 2025 RCB beat KKR by 7 wickets : विराट कोहली आणि फिल साल्ट यांच्यातील ९५ धावांच्या मजबूत भागीदारीमुळे, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) कोलकाता नाईट रायडर्स (KKR) ला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत करून धमाकेदार सुरुवात केली आहे. आयपीएलच्या १८ व्या हंगामातील पहिला सामना शनिवारी ईडन गार्डन्सवर खेळवण्यात आला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना, गतविजेत्या संघाने अजिंक्य रहाणे आणि सुनील नरेन यांच्या शतकी भागीदारीच्या जोरावर २० षटकांत आठ गडी गमावून १७४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, आरसीबीने १६.२ षटकांत तीन गडी गमावून १७७ धावा केल्या आणि सामना सात गडी राखून जिंकला.
अजिंक्य रहाणेने साकारली कर्णधारपदाला साजेशी खेळी –
या सामन्यात आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना कोलकाताची सुरुवात चांगली झाली नाही, सलामीवीर क्विंटन डी कॉक केवळ चार धावा काढून जोश हेझलवूडच्या चेंडूवर बाद झाला. यानंतर सुनील नारायण आणि अजिंक्य रहाणे यांनी डावाची सूत्रे हाती घेतली. दोघांमध्ये दुसऱ्या विकेट्ससाठी ५५ चेंडूत १०३ धावांची शतकी भागीदारी झाली. पहिल्यांदाच केकेआरचे नेतृत्व करणाऱ्या रहाणेने केवळ २५ चेंडूत त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील ३१ वे अर्धशतक पूर्ण केले. तो ३१ चेंडूत ५६ धावा काढून बाद झाला.
Spirited comeback with the ball ✅
Dominating effort with the bat ✅@RCBTweets are up and away in #TATAIPL 2025 with a commanding win over #KKR ❤️Scorecard ▶ https://t.co/C9xIFpQDTn#KKRvRCB pic.twitter.com/zs6fXmhYv9
— IndianPremierLeague (@IPL) March 22, 2025
त्याचबरोबर सुनील नरेनने पाच चौकार आणि तीन षटकारांसह ४४ धावा केल्या. या दोन्ही फलंदाज बाद झाल्यानंतर केकेआरचा डाव डळमळीत झाला. येथून संघाने नियमित अंतराने विकेट्स गमावल्या. अंगकृष रघुवंशीने ३०, वेंकटेश अय्यरने सहा, आंद्रे रसेलने चार, हर्षित राणाने पाच धावा केल्या. दरम्यान, रमनदीप सिंग सहा धावांवर आणि स्पेन्सर जॉन्सन एका धावेवर नाबाद राहिले. अशाप्रकारे, केकेआरने २० षटकांत आठ गडी गमावून १७४ धावा केल्या. आरसीबीकडून कृणाल पंड्या सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला, त्याने तीन विकेट्स घेतल्या, तर जोश हेझलवूडने दोन विकेट्स घेतल्या. याशिवाय यश दयाल, रसिक सलाम आणि सुयश शर्मा यांना प्रत्येकी एक विकेट्स मिळाली.
हेही वाचा – KKR vs RCB : ‘झुमे जो पठाण….’, या गाण्यावर किंग खान आणि किंग कोहलीने केला भन्नाट डान्स, VIDEO होतोय व्हायरल
सॉल्ट आणि विराटने साकारली स्फोटक फलंदाजी –
The chase master at work 🫡
FIFTY 🆙 for Virat Kohli as he continues to entertain Kolkata with his batting masterclass ✨
Updates ▶ https://t.co/C9xIFpQDTn#TATAIPL | #KKRvRCB | @imVkohli pic.twitter.com/Icfo35EvJs
— IndianPremierLeague (@IPL) March 22, 2025
लक्ष्याचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चांगली सुरुवात केली. आरसीबीचे सलामीवीर फिल साल्ट आणि विराट कोहली यांनी ८.३ षटकांत पहिल्या विकेटसाठी ९५ धावांची भागीदारी केली. दोघांमधील या भागीदारीमुळे या सामन्यात बेंगळुरूचा विजय जवळजवळ निश्चित झाला होता. या सामन्यात फिल सॉल्ट ३१ चेंडूत ५६ धावा करून बाद झाला. तो स्पेंसर जॉन्सनच्या गोलंदाजीवर वरुण चक्रवर्तीने झेलबाद झाला. यानंतर, तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेला देवदत्त पडिक्कल काही खास कामगिरी करू शकला नाही आणि १० धावा करून बाद झाला.
हेही वाचा – KKR vs RCB : स्टंपला बॅट लागूनही सुनील नरेन का झाला नाही Hit Wicket? नेमका काय आहे नियम? जाणून घ्या
यानंतर, कर्णधार रजत पाटीदार विराटला पाठिंबा देण्यासाठी आला. १६ चेंडूत ३४ धावा करून पाटीदार बाद झाला. विराट कोहली ३६ चेंडूत ५९ धावा करून नाबाद परतला. त्याच्या खेळीदरम्यान त्याने ४ चौकार आणि ३ षटकार मारले. या सामन्यात, आरसीबीच्या फलंदाजांसमोर केकेआरचे गोलंदाज असहाय्य दिसत होते. असे वाटत होते की त्याच्याकडे बंगळुरूच्या फलंदाजांना उत्तर नव्हते. आता पुढील सामन्यात केकेआर संघ कोणत्या योजनेने आणि दृष्टिकोनाने मैदानात उतरेल हे पाहणे बाकी आहे.