IPL 2025 KKR vs RCB Sunil Narine hit wicket video viral : आयपीएलच्या १८ व्या हंगामाची सुरुवात कोलकाता येथे केकेआर आणि आरसीबी यांच्यातील सामन्याने धमाकेदार झाली. या सामन्यात केकेआर संघाने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केली. ज्यामध्ये संघाने कर्णधार अजिंक्य रहाणे आणि सुनील नरेनच्या शतकी भागीदारीने आरसीबीसमोर १७५ धावांचे लक्ष्य ठेवले. दरम्यान या सामन्यात सुनील नरेनची बॅट स्टम्पला लागली होती, तरी ही त्याला आऊट दिले नाही. ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
हिट विकेट झाल्यानंतरही नरेन राहिला नॉटआऊट –
कोलकाता नाईट रायडर्सचा सलामीवीर सुनील नरेनची बॅट स्टंपला लागली. ही घटना ८ व्या षटकात घडली. रसिक सलामने एक स्लॅम्ड चेंडू टाकला. जो नरेनच्या डोक्यावरून थेट यष्टीरक्षकाच्या हातात गेला. या वेळी सुनील नरेनची बॅट स्टंपला लागली. यादरम्यान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे कर्णधार रजत पाटीदार आणि टिम डेव्हिड यांनी याबाबत अपील केले.
सुनील नरेन कसा राहिला नॉट आऊट?
— kuchnahi123@12345678 (@kuchnahi1269083) March 22, 2025
या चेंडूवर सुनील नरेनने पुल शॉट मारण्याचा प्रयत्न केला, पण त्यात तो यशस्वी झाला नाही. यानंतर चेंडू मागे यष्टीरक्षकाकडे गेला होता. पंचांनी वाईड देण्यासाठी हात वर केला आणि त्याच वेळी नरेनची बॅट स्टंपला लागली. एकदा पंचांनी निर्णय दिला की, त्यानंतर घडणाऱ्या कोणत्याही घटनेने काही फरक पडत नाही. या कारणास्तव पंचांनी आरसीबी खेळाडूंच्या अपीलकडे लक्ष दिले नाही.
हेही वाचा – KKR vs RCB : ‘झुमे जो पठाण….’, या गाण्यावर किंग खान आणि किंग कोहलीने केला भन्नाट डान्स, VIDEO होतोय व्हायरल
काय आहे हिट विकेटचा नियम?
एमसीसी नियम ३५.१.१ नुसार, जर गोलंदाजाने चेंडू टाकल्यानंतर चेंडू डेथ होण्यापूर्वी फलंदाजाच्या बॅटचा किंवा शरीराचा कोणताही भाग स्टंपला लागला, तर तो हिट-विकेट आऊट असतो. सुनील नरेनच्या प्रकरणात पंचानी चेंडू वाईड असल्याचा निर्णय दिला होता आणि त्याचबरोबर चेंडू डेथ झाला होता.त्यामुळे सुनील नरेनच्या बाबतीत हिट-विकेट नियम लागू झाला नाही.