IPL 2025 captains salary of 10 team captains : आयपीएल २०२५ स्पर्धेला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. आयपीएलच्या १८व्या हंगामाला केकेआर आणि आरसीबी यांच्यातील सामन्याने सुरुवात होणार आहे. या स्पर्धेबद्दल चाहत्यांमध्ये नेहमीच प्रचंड क्रेझ आहे. कारण ही जगातील सर्वात मोठी आणि लोकप्रिय लीग आहे. यंदाच्या हंगामासाठी सर्व संघांनी त्यांचे कर्णधारही जाहीर केले आहेत. त्यामुळे आज यंदा कोणत्या संघाचा कर्णधार सर्वात महागडा आणि सर्वात स्वस्त ठरला आहे? जाणून घेऊया. ऋषभ पंत यंदाच्या हंगामातील सर्वात महागडा कर्णधार – यावर्षीच्या आयपीएलमध्ये लखनौ सुपर जायंट्सची धुरा ऋषभ पंतकडे सोपवण्यात आली आहे. आयपीएल २०२५ च्या मेगा ऑक्शनमध्ये तब्बल ऋषभ पंतवर २७ कोटींची बोली लावली होती. ज्यामुळे तो या वर्षीच्या आयपीएलमधील सर्वात महागडा कर्णधार ठरणार आहे. एवढेच नाही तर तो आता आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू देखील ठरला आहे. आतापर्यंत आयपीएलमध्ये कोणत्याही खेळाडूसाठी यापेक्षा जास्त बोली लावण्यात आलेली नाही. पंजाब किंग्जनेही श्रेयस अय्यरवर पाडला पैशांचा पाऊस – आयपीएलच्या मेगा ऑक्शनध्ये ऋषभ पंत व्यतिरिक्त श्रेयस अय्यरलाही मोठी मागणी होती. लिलावाच्या दिवशी त्याच्यासाठीही आयपीएल संघांमध्ये चढाओढ पाहायला मिळाली. अखेर पंजाब किंग्जने त्याला २६.७५ कोटी रुपये खर्च करून आपल्या संघात सामील केले. ज्यामुळे तो आयपीएल २०२५ चा दुसरा सर्वात महागडा कर्णधार आहे. सनरायझर्स हैदराबादने पॅट कमिन्सला १८ कोटी रुपयांना कायम ठेवले. यावेळी त्याला तेवढेच पैसे मिळतील. म्हणजेच, तो आयपीएल २०२५ चा तिसरा सर्वात महागडा कर्णधार आहे. हेही वाचा – BCCI ला मोठा झटका! शमी-बुमराहच्या पुनरागमनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या व्यक्तीने दिला राजीनामा कमिन्स-गायकवाड आणि सॅमसन यांना समान पैसे – पॅट कमिन्स हा एकमेव कर्णधार नाही, ज्याला १८ कोटी रुपये मिळत आहेत. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार ऋतुराज गायकवाडलाही तेवढेच कोटी रुपये देणार आहे, त्यालाही संघाने कायम ठेवले आहे. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनला त्याच्या संघाने १८ कोटी रुपयांना कायम ठेवले आहे. दिल्ली कॅपिटल्सने नुकताच त्यांचा कर्णधार घोषित केला आहे, अक्षर पटेलकडे संघाची कमान सोपवण्यात आली आहे. त्याला संघाने १६.५ कोटी रुपयांना कायम ठेवले आहे. गुजरात टायटन्सने शुबमन गिललाही त्याच रकमेत कायम ठेवले आहे, तो यावेळीही संघाचे नेतृत्व करताना दिसेल. हेही वाचा – IML T20 Final 2025 : फायनल सामन्यात युवराज आणि वेस्ट इंडिजच्या खेळाडूमध्ये जुंपली, ‘या’ कारणामुळे झाली वादावादी, पाहा VIDEO अजिंक्य रहाणे आहे आयपीएल २०२५ मधील सर्वात स्वस्त कर्णधार – मुंबई इंडियन्सने कर्णधार हार्दिक पंड्यावर १६.३५ कोटी रुपये खर्च करुन त्याला कायम ठेवले आहे. मात्र, आरसीबी रजत पाटीदार ११ कोटी रुपये देऊन कायम ठेवत संघाची धुरा सोपवली आहे. आता जर सर्वात स्वस्त कर्णधार कोणत्या संघाचा ठरला असेल, तर तो कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार आहे. केकेआरने आयपीएल २०२५ च्या लिलावात अजिंक्य रहाणेला १.५ कोटी रुपये देत संघात सामील करुन घेतले. यानंतर आता त्याच्याकडेच संघाची धुरा सोपवली आहे. ज्यामुळे केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणे हा सर्वात स्वस्त करणार ठरला आहे. याआधी त्याने रायझिंग सुपरजायंट्स पुणे आणि राजस्थान रॉयल्सचे नेतृत्त्व केले आहे.