IML T20 Final 2025 : फायनल सामन्यात युवराज आणि वेस्ट इंडिजच्या खेळाडूमध्ये जुंपली, ‘या’ कारणामुळे झाली वादावादी, पाहा VIDEO

IML T20 Final 2025 Yuvraj Singh and Tino Best Controversy : रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग २०२५ (आयएमएल टी-२०) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इंडिया मास्टर्स आणि वेस्ट इंडिज मास्टर्स यांच्यात जोरदार लढत पाहायला मिळाली. या सामन्यात इंडिया मास्टर्सने ६ विकेट्सनी विजय मिळवत ट्रॉफीवर नाव कोरले. दरम्यान या रोमांचक सामन्यात युवराज सिंग आणि टिनो बेस्ट यांच्यात जोरदार वादावादी झाली, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
वादाला केव्हा सुरुवात झाली?
या सामन्यात प्रथम फलंदाजी करायला आलेल्या वेस्ट इंडिज मास्टर्सला इंडिया मास्टर्सने केवळ ७ बाद १४८ धावा रोखले. इंडिया मास्टर्सकडून विनय कुमार आणि शाहबाज अहमद यांनी शानदा गोलंदाजी केली. यानंतर १४९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अष्टपैलू युवराज सिंग आणि वेगवान गोलंदाज टिनो बेस्ट यांच्यात वाद झाला. ही घटना इंडिया मास्टर्सच्या डावातील १३व्या षटकानंतर घडली. हे प्रकरण इतके वाढले होते की इतर खेळाडू आणि पंचांना हस्तक्षेप करावा लागला. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
कशावरुन झाला वाद?
Lafda with Yuvraj vs Tino best ☠️ #IMLT20Final #YuvrajSingh #IMLT20
— CricFreak69 (@Twi_Swastideep) March 16, 2025
जेव्हा टिनो बेस्टने त्याचे षटक पूर्ण केले आणि दुखापतीचे कारण देऊन मैदान सोडू इच्छित होता, तेव्हा या वादाला सुरुवात झाली. कारण युवराज सिंगने याचा निषेध केला आणि या मुद्द्याबाबत पंचांशी चर्चा केली. यानंतर पंचांनी टिनो बेस्टला मैदानावरच राहण्यास सांगितले. पंचांच्या आदेशानंतर वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाजावर तो युवराज सिंगकडे गेला. ज्यामुळे दोघांमध्ये वादावादी सुरु झाली. ज्यामध्ये कोणीही मागे हटण्यास तयार नव्हते. यानंतर खूपच तणावाची स्थिती निर्माण झाल्याने वेस्ट इंडिज मास्टर्सचा कर्णधार ब्रायन लाराला हस्तक्षेप करावा लागला. त्याचबरोबर अंबाती रायुडू देखील दोघांनाही शांत होण्यास सांगताना दिसला.
हेही वाचा – BCCI ला मोठा झटका! शमी-बुमराहच्या पुनरागमनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या व्यक्तीने दिला राजीनामा
वादानंतर युवराज त्याच्या जुन्या शैलीत दिसला –
या वादानंतर, युवराज त्याच्या जुन्या शैलीत त्याच्या बॅटने उत्तर देताना दिसला. त्याने एक लांब षटकार मारला आणि टिनो बेस्टला आपला दृष्टिकोन दाखवला. २००७ च्या टी२० विश्वचषकातही युवराजची हीच शैली होती. त्याने स्टुअर्ट ब्रॉडला ६ षटकार मारून आपला राग व्यक्त केला होता. त्या काळात त्याचे अँड्र्यू फ्लिंटॉफशी भांडण झाले होते. युवीने अंतिम सामन्यात १६ धावांची खेळी खेळली. त्याच वेळी, सामन्याचा नायक अंबाती रायुडू ठरला, ज्याने ७४ धावांची खेळी साकारत इंडिया मास्टर्सला विजय मिळवून दिला.





