KKR vs RCB : अजिंक्य रहाणेने IPL 2025 च्या पहिल्याच सामन्यात रचला इतिहास! ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू

IPL 2025 KKR vs RCB Ajinkya Rahane create history : आयपीएल २०२५ ची सुरुवात शनिवारी गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या सामन्याने झाली आहे. यावेळी केकेआरचा नवीन कर्णधार अजिंक्य रहाणेच्या या सामन्यात उतरताच इतिहास रचला आहे. त्याने असा एक पराक्रम केला आहे, जो आयपीएलच्या इतिहासात कोणत्याच खेळाडूला करता आलेला नाही. तो या असा विशेष पराक्रम करणारा एकमेव कर्णधार आहे.
अजिंक्य रहणेने रचला इतिहास –
केकेआर आणि आरसीबी यांच्यातील पहिला सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात आरसीबीचा नवा कर्णधार रजत पाटीदारने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रजत आयपीएलमध्ये पहिल्यांदाच संघाचे नेतृत्व करत आहे. या सामन्यात केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणे टॉससाठी येताच त्याने एक विक्रम केला. आयपीएलमध्ये तीन फ्रँचायझींचे नेतृत्व करणारा आयपीएल इतिहासातील तो पहिला खेळाडू ठरला आहे.
Rahane is a run machine
Well played Rahane – 27 boll 54 run and 200 percent strike rate #TATAIPL | #TATAIPL2025 | #RCBvsKKR #ajinkyarahane @ajinkyarahane88 pic.twitter.com/IYfdLpMNdO
— Uday Bhan Singh (@IAMUdya) March 22, 2025
अजिंक्य रहाणे आयपीएल इतिहासात हा पराक्रम करणारा पहिलाच कर्णधार –
अजिंक्य रहाणे तिसऱ्या संघाचे नेतृत्व करत आहे. यापूर्वी त्याने रायझिंग पुणे सुपरजायंट्स, राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व केले आहे आणि आता तो कोलकाता नाईट रायडर्सचे नेतृत्व करत आहे. गेल्या वर्षी श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली कोलकाताने विजेतेपद जिंकले होते, पण यावेळी अय्यर संघात नाही कारण फ्रँचायझीने त्याला कायम ठेवले नाही. यावेळी तो पंजाब किंग्जचे नेतृत्व करत आहे. त्यामुळे यंदा अजिंक्य रहाणेवर जेतेपदाचे कायम राखण्याची जबाबदारी आहे.
हेही वाचा – IPL 2025 : नवा नियम ! बीसीसीआयने सुपर ओव्हरबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय
आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन:
केकेआर : क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), वेंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंग, अंगकृष रघुवंशी, सुनील नारायण, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, स्पेन्सर जॉन्सन, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.
हेही वाचा –Virat Kohli : आयपीएल 2025 स्पर्धेत विराट कोहली मोडणार ‘हे’ 5 मोठे विक्रम
आरसीबी : विराट कोहली, फिल साल्ट (यष्टीरक्षक), रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, टिम डेव्हिड, कृणाल पंड्या, रसिक दार सलाम, सुयश शर्मा, जोश हेझलवूड, यश दयाल.





