Ajinkya Rahane Retires : सचिन-विराटला जे कधीच जमलं नाही, ते लॉर्ड्सवर करुन दाखवणाऱ्या अजिंक्य रहाणेचा क्रिकेटला रामराम!
Ajinkya Rahane Retires : अजिंक्य रहाणेने सोशल मीडियावर एक अत्यंत भावुक व्हिडीओ शेअर करत आपल्या क्रिकेट कारकिर्दीला पूर्णविराम दिला.

Ajinkya Rahane Retires From International Cricket Lords Test Century Record Sachin Virat : भारतीय क्रिकेट संघाचा माजी उपकर्णधार आणि कसोटी क्रिकेटमधील भरवशाचा फलंदाज अजिंक्य रहाणेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटसह सर्व प्रकारच्या क्रिकेट मधून निवृत्तीची घोषणा केली आहे. रहाणेने सोशल मीडियावर एक अत्यंत भावुक व्हिडीओ शेअर करत आपल्या क्रिकेट कारकिर्दीला पूर्णविराम दिला. गेल्या तीन वर्षांपासून तो भारतीय संघातून बाहेर होता. देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करून त्याने संघात पुनरागमन करण्याचे शर्थीचे प्रयत्न केले, मात्र त्याला पुन्हा संधी मिळू शकली नाही. अखेर त्याने क्रिकेटला अलविदा म्हणण्याचा मोठा निर्णय घेतला.
सचिन अन् विराटलाही न जमलेला ‘लॉर्ड्स’चा तो रेकॉर्ड!
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीनंतर त्याच्या कारकिर्दीतील अनेक सोनेरी पानांना उजाळा मिळत आहे. अनेक भारतीय फलंदाजांना परदेशी खेळपट्ट्यांवर संघर्ष करावा लागत असताना, रहाणेने मात्र ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेत मायदेशापेक्षाही अधिक खोऱ्याने धावा कुटल्या. रहाणेच्या नावावर असा एक ऐतिहासिक विक्रम नोंदवला गेला आहे, जो क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आणि किंग विराट कोहली या दिग्गजांनाही त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत कधीच करता आला नाही.
An illustrious career comes to an end 🇮🇳
Thank you @ajinkyarahane88 for your immense contribution to Indian cricket and all the memories that will be cherished forever
Wishing you the very best in your next chapter #TeamIndia | #ThankYouAjinkya pic.twitter.com/Gbi7sIcgwS
— BCCI (@BCCI) July 30, 2026
Leadership, resilience, ultimate belief 💪
🎥 Throwback to Captain @ajinkyarahane88‘s inspiring words following #TeamIndia’s iconic Border-Gavaskar Trophy victory in 2020-21 🏆#ThankYouAjinkya pic.twitter.com/I1CzlzyC5c
— BCCI (@BCCI) July 30, 2026
तो विक्रम म्हणजे ‘क्रिकेटची पंढरी’ समजल्या जाणाऱ्या ऐतिहासिक लॉर्ड्स (Lords) मैदानावर कसोटी शतक झळकावणे! त्याने अँडरसन-ब्रॉडच्या नाकावर टिच्चून हे शतक ठोकले होते. १७ जुलै २०१४ रोजी इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीत भारतीय संघ प्रचंड दबावात असताना, अजिंक्य रहाणेने जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांसारख्या खतरनाक गोलंदाजांचा खंबीरपणे सामना करत १०३ धावांची स्फोटक आणि संस्मरणीय शतकी खेळी केली होती. सचिन आणि विराटला लॉर्ड्सवर कधीही शतक करता आलेले नाही, मात्र रहाणेने ही कामगिरी करून दाखवली.
An unforgettable knock 🤝 A special honour
🎥 Captain @ajinkyarahane88‘s masterful 1️⃣1️⃣2️⃣(223) in a crucial contest in Melbourne during the Border-Gavaskar Trophy 2020-21 earned him a place on the MCG Honours Board 🙌#TeamIndia | #ThankYouAjinkya pic.twitter.com/iIgmPFoFDk
— BCCI (@BCCI) July 30, 2026
लॉर्ड्सवर कसोटी शतक झळकावणारे भारतीय फलंदाज:
- दिलीप वेंगसरकर – ३ शतकं
- केएल राहुल – २ शतकं
सौरव गांगुली, राहुल द्रविड, अजिंक्य रहाणे, अजित आगरकर, विनू मंकड, मोहम्मद अझरुद्दीन, गुंडप्पा विश्वनाथ, रवी शास्त्री या खेळाडूंनी प्रत्येकी १ शतक लॉर्डसवर झळकावले आहे.





