IPL 2025 Closing Ceremony : ऑपरेशन सिंदूरची झलक, शंकर महादेवनचा जादुई आवाज…; ‘IPL’चा समारोप ठरणार अविस्मरणीय!

IPL 2025 Closing Ceremony Updates : आयपीएल २०२५ चा अंतिम सामना मंगळवारी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल. पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणाऱ्या या जेतेपदाच्या सामन्यापूर्वी समारोप समारंभ होईल. त्याची थीम ‘ऑपरेशन सिंदूर’ आहे. या कार्यक्रमासाठी तिन्ही सैन्याच्या प्रमुखांना आमंत्रित करण्यात आले आहे. तथापि, त्यांचा सहभाग अद्याप निश्चित झालेला नाही. संपूर्ण स्टेडियम तिरंगी दिव्यांनी सजवले जाईल आणि या दरम्यान गायक शंकर महादेवन यांचा लाईव्ह कॉन्सर्ट होईल.
शंकर महादेवन करणार सादरीकरण –
आयपीएल २०२५ समापन समारंभात, प्रसिद्ध गायक शंकर महादेवन भारतीय सशस्त्र दलांना समर्पित गाणे गातील. शंकर त्यांचे पुत्र सिद्धार्थ आणि शिवम महादेवन यांच्यासोबत कार्यक्रमात सादरीकरण करतील. शंकर यांच्या सादरीकरणातून ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी असलेल्या शूर सैनिकांचा सन्मान केला जाईल आणि पहलगाम हल्ल्यात प्राण गमावलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात येईल.
A Grand #Final. A Grander Salute. 🫡
As the final chapter of #TATAIPL 2025 unfolds, we take a moment to applaud our nation’s true heroes, the Indian Armed Forces. 🇮🇳💙
Get ready to witness an unforgettable evening where patriotism takes centre stage and music moves the soul,… pic.twitter.com/QucxvMXhAW
— IndianPremierLeague (@IPL) June 2, 2025
अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये समारोप समारंभ होणार आहे. ६३ एकरवर पसरलेल्या या स्टेडियममध्ये १ लाख ३२ हजार प्रेक्षक बसू शकतात. समारोप समारंभ सामना सुरू होण्यापूर्वी आज संध्याकाळी ६ वाजता सुरू होईल. गायक शंकर महादेवन यांच्याव्यतिरिक्त स्थानिक कलाकार सादरीकरण करतील. समारोप समारंभाचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्क चॅनेलवर केले जाईल. त्याचे ऑनलाइन लाईव्ह स्ट्रीमिंग जिओहॉटस्टार अॅप आणि वेबसाइटवर असेल.
हेही वाचा – Heinrich Klaasen : मॅक्सवेल पाठोपाठ ‘या’ दिग्गज खेळाडूने देखील घेतली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
हा कार्यक्रम आपल्या सैनिकांना समर्पित -सैकिया
बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी आम्ही लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश के. त्रिपाठी आणि हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंग यांच्यासह इतर लष्करी अधिकारी आणि सैनिकांना अहमदाबादमध्ये आयपीएलचा अंतिम सामना पाहण्यासाठी आमंत्रित केले आहे.





