#INDvAFG T20I Series | रोहित शर्माला कर्णधार म्हणून ‘एक’ मोठा विक्रम करण्याची संधी…

Most Six As Captain In T20 : अलीकडेच रोहित शर्माने वर्ल्ड कपमध्ये एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला होता. वास्तविक, रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरला आहे. त्याचबरोबर भारतीय कर्णधार लवकरच आणखी एक विक्रम आपल्या नावावर करू शकतो.
रोहित शर्माने 5 षटकार मारताच, कर्णधार म्हणून तो आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनेल. अफगाणिस्तानविरुद्धच्या 3 टी-20 सामन्यांच्या मालिकेत भारतीय कर्णधार हा टप्पा गाठू शकतो. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील मालिकेतील पहिला सामना 11 जानेवारीला होणार आहे.
रोहित शर्माने भारताकडून टी-20 सामन्यात कर्णधार म्हणून 82 षटकार ठोकले आहेत. पण कर्णधार म्हणून सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत इऑन मॉर्गन अव्वल आहे. इऑन मॉर्गनने कर्णधार म्हणून 86 षटकार मारले आहेत. त्याचबरोबर या यादीत रोहित शर्मा दुसऱ्या स्थानावर आहे.
टी-20 व्यतिरिक्त रोहितने ODI आणि Test मध्येही लगावलेत षटकार….
आकडेवारी दर्शवते की, रोहित शर्माने भारतासाठी 148 टी-20 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये या फलंदाजाने 182 षटकार मारले आहेत. याशिवाय रोहित शर्माने 262 एकदिवसीय सामन्यांमध्ये 323 षटकार ठोकले आहेत. त्याच वेळी, भारतीय कर्णधाराने 54 कसोटी सामन्यांमध्ये 77 षटकार ठोकले आहेत. तसेच रोहित शर्माने आयपीएल सामन्यांमध्येही भरपूर षटकार ठोकले आहेत. रोहित शर्माच्या नावावर आयपीएलच्या 243 सामन्यांमध्ये 257 षटकार आहेत. सध्या रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचा भाग आहे, पण याआधी तो डेक्कन चार्जर्स हैदराबादकडून खेळला आहे.
IND vs ENG Test Series 2024 : पहिल्या दोन कसोटींना शमी मुकणार; समोर आलं ‘हे’ कारण…
14 महिन्यांनंतर टी-20 संघात पुनरागमन…
रोहित शर्माचे तब्बल 14 महिन्यांनंतर भारतीय टी-20 संघात पुनरागमन झाले आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या 3 टी-20 सामन्यांच्या मालिकेत रोहित शर्मा टीम इंडियाचे नेतृत्व करेल. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील मालिकेतील पहिला टी-20 सामना 11 जानेवारी रोजी खेळवला जाणार आहे. मोहालीत दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. यानंतर दुसरा टी-20 इंदूरमध्ये 14 जानेवारीला खेळवला जाणार आहे. त्यानंतर 17 जानेवारीला तिसरा म्हणजेच शेवटचा टी-20 सामना बेंगळुरूमध्ये खेळवला जाईल. या मालिकेतील सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरू होतील.





