IPL 2024 (RR vs PBKS Match 65) : राजस्थानसमोर आज पंजाबचे आव्हान, प्लेऑफमध्ये स्थान पक्के करण्यासाठी संजूचा संघ उतरणार मैदानात….

IPL 2024 (RR vs PBKS Match 65) : आयपीएल 2024 चा 65 वा सामना बुधवारी राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात गुवाहाटी येथील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता होणार आहे. गुवाहाटीमध्ये या मोसमातील हा पहिलाच सामना असेल. राजस्थानने गुवाहाटीला आपले दुसरे होम ग्राउंड बनवले आहे. पंजाब किंग्ज आधीच प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. त्याचवेळी, राजस्थान रॉयल्स आयपीएल 2024 च्या पॉइंट टेबलमध्ये 16 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. प्लेऑफचे तिकीट बुक करण्यासाठी त्यांना फक्त एका विजयाची गरज आहे. तथापि, एक चूक देखील त्यांना महागात पडू शकते.
जरी राजस्थान रॉयल्स आयपीएल 2024 च्या पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. पण, संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील या संघाने मागील तीन सामने गमावले आहेत. राजस्थानने आतापर्यंत 12 सामने खेळले असून त्यांचे 16 गुण आहेत. त्याचे शेवटचे दोन सामने पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध आहेत. जर राजस्थानने पंजाबविरुद्धचा सामना जिंकला तर प्लेऑफचे तिकीट पक्के होईल आणि जर राजस्थान संघ हरला तर त्याचा टेबल टॉपर KKR विरुद्धचा अखेरचा सामना करो या मरो अशा स्थितीचा असेल.
हेड-टू-हेड रेकॉर्ड….
राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील शेवटच्या 5 सामन्यांबद्दल बोलायचे झाल्यास, राजस्थानने चार सामने जिंकले आहेत. या मोसमात झालेला शेवटचा सामना राजस्थानने एक चेंडू शिल्लक असताना ३ विकेटने जिंकला होता. अशा स्थितीत राजस्थानचा वरचष्मा आहे. दोन्ही संघांमध्ये एकूण 27 सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी 16 राजस्थानने तर 11 पंजाबने जिंकले आहेत.
बारसापारा क्रिकेट स्टेडियमवरील आकडेवारी…
राजस्थान रॉयल्सने बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर आतापर्यंत 2 सामने खेळले आहेत. या कालावधीत संघाने 1 विजय आणि 1 पराभव पत्करला आहे. दुसरीकडे पंजाब किंग्सने या मैदानावर केवळ 1 सामना खेळला असून त्यात विजय मिळवला आहे. पंजाबने प्रथम फलंदाजी करत हा सामना जिंकला होता.
राजस्थानची ताकद त्याची फलंदाजी…
राजस्थानची ताकद त्याची फलंदाजी आहे. संजू सॅमसन आणि रियन पराग यांनी संपूर्ण हंगामात राजस्थानसाठी शानदार फलंदाजी केली. जोस बटलरनेही संघाकडून दोन शतके झळकावली आहेत, मात्र तो पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी मायदेशी परतला आहे. संघाच्या मधल्या फळीला धावा करता येत नाहीत. दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात संघाच्या पराभवाचे हेही एक कारण होते. याशिवाय गोलंदाजही महत्त्वाच्या प्रसंगी धावा देत आहेत. संजूने 10 सामन्यात 389 धावा केल्या आहेत. त्याचवेळी रियानने 10 सामन्यात 356 धावा केल्या आहेत. युझवेंद्र चहल आणि आवेश खान संघासाठी महत्त्वाचे ठरू शकतात. चहलने 10 सामन्यात 12 तर आवेशने 10 सामन्यात 10 बळी घेतले आहेत.
पंजाब किंग्ज या मोसमात ठरले अपयशी….
पॉइंट टेबलमध्ये पंजाब किंग्ज शेवटच्या स्थानावर आहे. पंजाबच्या निराशाजनक कामगिरीचे कारण म्हणजे या हंगामात संघाच्या शीर्ष क्रमाची खराब कामगिरी. शिखर धवनही अपयशी ठरला. त्याचवेळी जॉनी बेअरस्टोने 8 सामन्यात 267 धावा केल्या होत्या. पण, त्याच्या कामगिरीत सातत्याचा अभाव स्पष्टपणे दिसून आला. शशांक सिंग पंजाबसाठी नक्कीच गेम चेंजर ठरला. त्याने 10 सामन्यात 331 धावा केल्या आहेत. राजस्थानविरुद्धच्या सामन्यातही त्याच्याकडून अपेक्षा असतील.
राजस्थान रॉयल्सला प्ले ऑफमधून बाहेर पडण्याचा धोका…
जर राजस्थान रॉयल्स संघाने आपले दोन्ही सामने (RRvsPBKS आणि RRvsKKR) मोठ्या फरकाने गमावले तर त्याचे गुण 16 च राहतील आणि एलएसजीने आपले दोन्ही सामने (LSGvsDC आणि LSGvsMI) मोठ्या फरकाने जिंकले तर त्याचे गुण 16 होतील त्याचवेळी, जर हैदराबादने आपले दोन्ही सामने (SRHvsGT आणि SRHvsPBKS) जिंकले तर त्याचेही गुण 18 होतील आणि CSK ने शेवटचा सामना जिंकला, तर त्याचेही गुण 16 होतील आणि संजूचा राजस्थान संघ नेट रनरेटच्या आधारे प्लेऑफमधून बाहेर पडू शकतो. यामध्ये लखनौनं मंगळवारी (14 मे) झालेला सामना जिंकला आणि राजस्थान पंजाबविरूध्द (बुधवार,15 मे) हरले तरच राजस्थानला धोका आहे अन्यथा पंजाबविरूध्द जिंकल्यास राजस्थान प्ले-आॅफसाठी पात्र ठरेल आणि इतर संघासाठीचे समीकरण बदलेल.





