IPL 2024 (#RCBvsPBKS Match 6) : ” एखादी निरुपयोगी गोष्ट…” मुरली कार्तिकची ‘यश दयाळ’वर बोचरी टीका

IPL 2024 (#RCBvsPBKS Match 6) – आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर बंगळुरू संघाने पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात वेगवान गोलंदाज यश दयाळ याला खेळवले. त्यावरून माजी कसोटीपटू व समालोचक मुरली कार्तिकने बोचरी टीका केली आहे. एखादी निरुपयोगी गोष्ट काहीवेळा उपयोगी ठरू शकते, असे वक्तव्य कार्तिकने समालोचना दरम्यान केले.
यावरून आता बंगळुरु संघाच्या चाहत्यांनी कार्तिकवरही टीका केली आहे. एक जबाबदार व्यक्ती म्हणून विधान करावे असा सल्लाही चाहत्यांनी कार्तिकला दिला आहे.
या सामन्यात बेंगळुरूने वेगवान गोलंदाज यश दयालला संधी दिली होती. यश दयाल गेल्या वर्षी आयपीएल गुजरात टायटन्सकडून खेळला होता. पण यंदाच्या आयपीएलपूर्वी गुजरातने त्याला करारमुक्त केल्याने तो लिलावात उतरला होता. लिलावात त्याला बंगळुरूने ५ कोटी रुपयांना खरेदी केले. गेल्या वर्षीच्या आयपीएलमध्ये गुजरातकडून खेळणाऱ्या दयालविरुद्ध रिंकू सिंगने सलग ५ षटकार मारत कोलकाता नाईट रायडर्सला विजय मिळवून दिला होता. त्यानंतर दयाल आणि रिंकू सिंग प्रकाशझोतात आले होते.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/ipl-2024-virat-kohli-opens-up-on-2-month-break-during-england-series/
बेंगळुरूने नाणेफेक जिंकल्यानंतर कार्तिक समालोचन करताना दयाळचा उल्लेख करताना आक्षेपार्ह भाषा वापरली. त्यामुळे आता कार्तिकच टीकेचा धनी बनला आहे. दयाळच्या अंतिम संघातील निवडीवरूनही कार्तिकसह अनेकांनी बंगळुरु संघ व्यवस्थापनावर टीका केली होती. मात्र, गेल्या स्पर्धेत त्याची कामगिरी कशी झाली हे पाहण्यापेक्षा यंदाच्या स्पर्धेत तो कशी कामगिरी करतो यावर आम्ही लक्ष देत आहोत, असे बंगळुरु संघ व्यवस्थापनाने म्हटले आहे.





