Riyan Parag Vaping Controversy : सामना जिंकला पण नशीब फिरलं! रियान परागला होणार जेल? ड्रेसिंग रूममधील ‘त्या’ व्हिडीओने क्रिकेट विश्वात खळबळ
Riyan Parag Vaping Controversy : आयपीएल २०२६ च्या हंगामात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग एका खळबळजनक वादात अडकला आहे.

Riyan Parag Vaping Controversy Video Viral : न्यू चंदीगडच्या मुल्लांपुर स्टेडियमवर पंजाब किंग्सविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर राजस्थान रॉयल्सच्या गोटात आनंदाचे वातावरण होते. मात्र, याच दरम्यान कर्णधार रियान परागचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर आगीसारखा पसरला. या व्हिड५ओमध्ये पराग ड्रेसिंग रूममध्ये ‘वेपिंग’ (E-Cigarette) करताना दिसत आहे. भारतात ई-सिगारेटवर पूर्णपणे बंदी असल्याने या प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे.
काय सांगतो भारतीय कायदा?
भारत सरकारने २०१९ मध्ये ई-सिगरेटच्या उत्पादन, विक्री आणि वापरावर पूर्णपणे बंदी घातली आहे. ‘ई-सिगारेट प्रतिबंधक कायदा २०१९’ नुसार, जर एखादी व्यक्ती पहिल्यांदा या गुन्ह्यात दोषी आढळली, तर तिला एक वर्षापर्यंतचा तुरुंगवास किंवा एक लाख रुपयांचा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. बीसीसीआयच्या (BCCI) अधिकाऱ्यांनी परागचे हे कृत्य अत्यंत बेजबाबदार असल्याचे म्हटले आहे.
Riyan Parag Smoking VAPE in dressing room 🤯 pic.twitter.com/EbIMI5qHxK
— Liam Livingstone (@NightmareOP9) April 28, 2026
कॅमेऱ्यांच्या युगात मोठी चूक –
ड्रेसिंग रूम में ई-सिगरेट पीते हुए दिखे रियान पराग विवादों से घिरे
भारत सरकार ने 2019 में ई-सिगरेट पर प्रतिबंध लगा दिया था, जिसमें इसका उत्पादन, बिक्री और वितरण शामिल था pic.twitter.com/KBavQH6Rlj
— Romita Tiwari (@romita_tiwari) April 29, 2026
आयपीएलच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक खेळाडू ई-सिगारेट वापरत असले तरी ते ड्रेसिंग रूममध्ये किंवा कॅमेऱ्यासमोर असे कृत्य करत नाहीत. प्रसारकांचे (Broadcasters) कॅमेरे सतत ड्रेसिंग रूमवर लक्ष ठेवून असताना परागने उघडपणे वेपिंग करणे ही मोठी चूक मानली जात आहे. यापूर्वी कप्तानांच्या बैठकीत ड्रेसिंग रूममधील गोपनीयतेचा (Privacy) मुद्दा उपस्थित करण्यात आला होता, मात्र परागच्या या कृत्यामुळे आता बीसीसीआयला कठोर पावले उचलणे भाग पडू शकते.
हेही वाचा – RR Vs PBKS : पंजाबच्या विजय रथाला राजस्थानने रोखलं ! जयस्वाल- फरेराने झळकावली अर्धशतकं
या घटनेमुळे रियान परागच्या प्रतिमेला मोठा तडा गेला असून, तरुण चाहत्यांसमोर चुकीचा आदर्श ठेवल्याबद्दल त्याच्यावर टीका होत आहे. त्याच्यावर कायदेशीर कारवाईसह तुरुंगवासाची टांगती तलवार निर्माण झाली आहे. बीसीसीआय आता यावर काय अधिकृत भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





