Riyan Parag Controversies : ‘वेपिंग’पासून ते ‘सर्च हिस्ट्री’पर्यंत; रियान परागचे ५ मोठे राडे, ज्यांनी क्रिकेट विश्व हादरलं! जाणून घ्या
Riyan Parag Controversies : राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग आणि वाद हे जणू एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मुल्लांपुर येथील 'वेपिंग' प्रकरणानंतर पराग पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला असला तरी, त्याच्या कारकिर्दीतील वादांची ही मालिका बरीच जुनी आहे.

Riyan Parag Top 5 Controversies : आयपीएल २०२६ मध्ये राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व करणाऱ्या रियान परागच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. ड्रेसिंग रूममध्ये ई-सिगारेट ओढताना कॅमेऱ्यात कैद झाल्याने त्याच्यावर कायदेशीर कारवाईची टांगती तलवार आहे. मात्र, परागसाठी हे काही नवीन नाही. यापूर्वीही त्याच्या अनेक कृत्यांमुळे बीसीसीआय आणि क्रिकेट चाहत्यांनी त्याच्यावर ताशेरे ओढले आहेत. त्याबाबत जाणून घेऊया
१. यूट्यूब सर्च हिस्ट्री लीक (२०२४)
रियान पराग यूट्यूब सर्च हिस्ट्री लीक
एका गेमिंग लाईव्ह स्ट्रीम दरम्यान रियानने चुकून आपली स्क्रीन शेअर केली होती. यावेळी त्याच्या यूट्यूब सर्च हिस्ट्रीमध्ये बॉलिवूड अभिनेत्रींबाबतचे अत्यंत आक्षेपार्ह कीवर्ड्स दिसून आले. या घटनेनंतर सोशल मीडियावर परागवर प्रचंड टीका झाली होती आणि त्याच्या वैयक्तिक आवडीनिवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले होते.
२. हर्षल पटेल आणि सिराजसोबत भर मैदानात भिडला (२०२२)
रियान परागचा हर्षल पटेलसोबतचा वाद
आरसीबी विरुद्धच्या एका सामन्यात हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर षटकार मारल्यानंतर पराग आणि हर्षलमध्ये जोरदार बाचाबाची झाली. सामना संपल्यानंतर जेव्हा मोहम्मद सिराज मध्यस्थी करण्यासाठी आला, तेव्हा पराग त्याच्याशीही भिडला. परिस्थिती इतकी चिघळली होती की, हर्षल पटेलने सामना संपल्यावर परागशी हस्तांदोलन करण्यासही नकार दिला होता.
३. अंपायरचा अपमान आणि उद्धट वर्तन
रियाग परागचे मैदानातील वर्तन आणि पंचांशी झालेला वाद
परागला मैदानावर अंपायर्सशी हुज्जत घालण्यासाठी ओळखले जाते. एकदा वाईड बॉल न दिल्यामुळे अंपायरकडे रागाने पाहणे आणि दुसऱ्या एका सामन्यात कॅच पकडल्यानंतर चेंडू जमिनीच्या जवळ नेऊन अंपायरची खिल्ली उडवणे, अशा हरकतींमुळे त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई देखील करण्यात आली आहे.
४. टी-२० वर्ल्ड कपबाबतचं ‘ते’ घमंडी विधान (२०२४)
रियान परागचे टी२० विश्वचषक २०२४ बाबतचं उद्धट विधान
२०२४ च्या टी-२० विश्वचषकापूर्वी एका मुलाखतीत पराग म्हणाला होता की, “मी विश्वचषकाचा एकही सामना पाहणार नाही. मी थेट तेव्हाच वर्ल्ड कप बघेन जेव्हा मी स्वतः त्यात खेळेन.” भारतीय संघाप्रती असलेली ही उदासीनता चाहत्यांना आवडली नाही आणि त्याला प्रचंड ट्रोल करण्यात आले.
५. ड्रेसिंग रूममधील व्हेपिंग वाद (आयपीएल २०२६) –
रियान पराग वेपिंगचा वाद
आता आयपीएल २०२६ मध्ये पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान राजस्थान रॉयल्सच्या ड्रेसिंग रूममध्ये रियान पराग व्हेपिंग (ई-सिगारेट) करताना दिसला. थेट प्रक्षेपणादरम्यान समोर आलेल्या या फुटेजमुळे, एक खेळाडू आणि कर्णधार सार्वजनिक ठिकाणी अशा पदार्थाचा वापर कसा करू शकतो, यावर सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली.





