Donavon Ferreira Apologize : राजस्थानला जिंकवल्यानंतर डोनोव्हान फरेराने सलमान खानची मागितली माफी, नेमकं प्रकरण काय? पाहा VIDEO
Donavon Ferreira Apologize : पंजाबविरुद्धच्या विजयाचा हिरो ठरलेल्या राजस्थानच्या डोनोव्हान फरेराने अभिनेता सलमान खानची माफी मागितली आहे.

Donavon Ferreira apologizes to Salman Khan : मुल्लांपुरच्या मैदानात मंगळवारी राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सच्या विजयी घोडदौडीला लगाम घालत आयपीएल २०२६ मधील आपला सर्वात संस्मरणीय विजय साजरा केला. २२३ धावांचे विशाल लक्ष्य गाठताना राजस्थानच्या फलंदाजांनी पंजाबच्या गोलंदाजीचे वाभाडे काढले. या विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो म्हणजे दक्षिण आफ्रिकेचा आक्रमक फलंदाज डोनोव्हान फरेरा. या सामन्यानंतर फरेराने अभिनेता सलमान खानची माफी मागितली आहे.
डोनोव्हान फरेराने का मागितली माफी?
पंजाब किंग्सविरुद्धच्या थरारक विजयानंतर राजस्थान रॉयल्सचा डोनोव्हान फरेरा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. विजयाचा आनंद साजरा करताना फरेराने बॉलीवूडचा ‘भाईजान’ सलमान खान याच्या एका जुन्या ट्विटवर मजेशीर प्रतिक्रिया दिली. २०१४ मध्ये सलमानने प्रीती झिंटाच्या संघाबाबत ट्विट केले होते की, “झिंटाची टीम जिंकली का?”. यावर राजस्थानने शेअर केलेल्या व्हिडिओत फरेराने हसत उत्तर दिले, “सॉरी भाई, आज नाही!”. फरेराचा हा अंदाज चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.
https://t.co/U2s15XO2hS pic.twitter.com/YMhtLXRbsG
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 28, 2026
फरेरा आणि शुभम दुबेची वादळी भागीदारी
A QUICKFIRE PARTNERSHIP! 🔥
Shubham Dubey and Donovan Ferreira’s stand at a run rate of 14.4 that raced #RR to a fiery finish 👏
RELIVE THE STAND ▶️ https://t.co/lp0ITz8L0j#TATAIPL | #KhelBindaas | #PBKSvRR pic.twitter.com/oRRjk6QOKB
— IndianPremierLeague (@IPL) April 28, 2026
एका वेळी राजस्थानला शेवटच्या ६ षटकांत ७१ धावांची गरज होती आणि सामना पंजाबच्या बाजूने झुकलेला वाटत होता. मात्र, फरेरा आणि विदर्भाचा स्टार शुभम दुबे यांनी सामन्याचे चित्र पालटले. फरेराने अर्शदीप सिंग आणि लॉकी फर्ग्युसन सारख्या वेगवान गोलंदाजांवर प्रहार केला, तर शुभम दुबेने अवघ्या १२ चेंडूंत नाबाद ३१ धावा कुटून राजस्थानला ४ चेंडू राखून विजय मिळवून दिला.
वैभव सूर्यवंशीची ‘विशाल’ सुरुवात –
या विजयाचा पाया १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीने रचला होता. त्याने केवळ १६ चेंडूंत ४३ धावांची झंझावाती खेळी केली. आपल्या खेळीत ५ उत्तुंग षटकार मारत त्याने पंजाबच्या गोलंदाजांवर सुरुवातीपासूनच दडपण आणले. विशेषतः अर्शदीपला मारलेले त्याचे फ्लिक शॉट्स प्रेक्षणीय होते. पंजाबकडून युझवेंद्र चहलने ३ विकेट्स घेतल्या, परंतु फरेरा आणि दुबेच्या आक्रमणासमोर पंजाबची बचावफळी पूर्णपणे अपयशी ठरली. या पराभवासोबतच पंजाब किंग्सचे यंदाच्या हंगामातील ‘अजेय’ राहण्याचे स्वप्न भंगले आहे.





