IPL 2024 (MI vs LSG Match 67) : पाऊस थांबल्यानंतर मैदानातून हटवले कव्हर, जाणून घ्या…कधी सुरू होणार मुंबईचा डाव

IPL 2024 (MI vs LSG Match 67) : आज IPL 2024 चा 67 वा सामना मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात खेळला जात आहे. मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लखनौने मुंबईसमोर 215 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पाऊस पूर्णपणे थांबला आहे. आता खेळ पुन्हा 10:50 वाजता सुरू होईल. सध्या षटकांमध्ये कोणतीही कपात केलेली नाही. म्हणजेच सामना पूर्ण 20 षटकांचा असेल. मुंबईची धावसंख्या 3.5 षटकात एकही विकेट न गमावता 33 धावा अशी आहे. रोहित शर्मा 13 चेंडूत 20 धावांवर तर डेवाल्ड ब्रेविस 10 चेंडूत 9 धावांवर खेळत आहे.
🚨 UPDATE 🚨
The covers are being taken off! 👍 👍
Play to restart at 10:50 P.M. with no loss of overs!
Stay Tuned! ⌛️
Follow the Match ▶️ https://t.co/VuUaiv5dPT #TATAIPL | #MIvLSG pic.twitter.com/1kjWNcM0gj
— IndianPremierLeague (@IPL) May 17, 2024
दरम्यान, काही वेळापूर्वी, मुंबई आणि लखनौ यांच्यात सुरू असलेल्या सामन्यात पावसाने व्यत्यय आणला. मुंबईच्या डावाच्या चौथ्या षटकात हलक्या रिमझिम पावसाला सुरुवात झाली त्यामुळे सामना मध्यंतरी थांबवण्यात आला होता आणि मैदान कव्हरने झाकण्यात आले होते.
तत्पूर्वी, नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या लखनौ सुपर जायंट्सने 20 षटकांत 6 गडी गमावून 214 धावा केल्या. पहिल्या 10 षटकांत लखनौची धावसंख्या 3 गडी बाद 69 धावा होती. मात्र, यानंतर निकोलस पूरनने अवघ्या 29 चेंडूंत 5 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने 75 धावा करत संघाला संकटातून बाहेर काढले. तर केएल राहुलने 41 चेंडूत 55 धावा केल्या. राहुलने 3 चौकार आणि 3 षटकार खेचले. मुंबई इंडियन्सकडून नुवान तुषारा आणि पियुष चावला यांनी प्रत्येकी 3-3 बळी घेतले.





