IPL 2024 (DC vs LSG Match 64) : लखनौनं दिल्लीविरुद्ध Toss जिंकला, कर्णधार राहुलनं घेतला ‘हा’ निर्णय…

IPL 2024 (DC vs LSG Match 64, Toss Update) : आज आयपीएल 2024 च्या 64 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा सामना लखनऊ सुपर जायंट्सशी होत आहे. हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. सामन्यास थोड्याच वेळात म्हणजे 7.30 वाजता सुरूवात होईल.
दिल्लीसाठी हा ‘करो या मरो’ चा सामना आहे. जर संघ हरला तर तो प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर जाईल. त्याचबरोबर नेट रनरेट सकारात्मक करण्यासाठी दिल्ली संघाला केवळ जिंकावे लागणार नाही, तर मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल. दिल्ली आणि लखनौचे प्रत्येकी 12 गुण आहेत. दिल्लीचा हा 14वा सामना आहे, तर लखनौचा 13वा सामना आहे.
तत्पूर्वी, झालेला नाणेफेकीचा कौल हा लखनौ सुपर जायंट्स संघाच्या बाजूनं लागला आहे. लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. (Lucknow Super Giants elect to field against Delhi Capitals) त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सचे खेळाडू प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरतील.
🚨 Toss Update 🚨
Lucknow Super Giants elect to field against Delhi Capitals.
Follow the Match ▶️ https://t.co/qMrFfL9gTv#TATAIPL | #DCvLSG pic.twitter.com/dxf8kBgKIf
— IndianPremierLeague (@IPL) May 14, 2024
लखनौ-दिल्ली हेड टू हेड रेकॉर्ड
लखनौ आणि दिल्ली यांच्यातील मागील चार सामन्यांबद्दल बोलायचे झाले तर लखनौने 3 सामने जिंकले आहेत. म्हणजे लखनौचा वरचष्मा आहे. दोन्ही संघांनी यापूर्वीचे सामने गमावले आहेत. दिल्ली कॅपिटल्सला एक दिवस आधी आरसीबीकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्याचवेळी, लखनौचा शेवटच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने 10 गडी राखून पराभव केला होता.
लखनौची कमजोरी म्हणजे गोलंदाजी….
दुखापतीमुळे मयंक यादवची आयपीएलमध्ये अनुपस्थिती लखनौ सुपर जायंट्सला चांगलीच महागात पडली आहे. यश ठाकूर आणि नवीन उल हक त्याची भरपाई करू शकले नाहीत. मोहसीन खानही दुखापतीमुळे शेवटचा सामना खेळू शकला नाही. कृणाल पांड्या आणि रवी बिश्नोई हेही फॉर्मात नाहीत.
दिल्लीचे कमकुवत क्षेत्ररक्षण…
आरसीबीविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात दिल्लीच्या खेळाडूंनी बरेच झेल सोडले, जे नंतर संघाला महागात पडले. लखनौविरुद्ध जिंकायचे असेल तर दिल्लीला ही चूक सुधारावी लागेल.





