IPL 2024 (#CSKvsGT Match 7) : गुजरातच्या पराभवानंतर कर्णधार गिलला आणखी एक मोठा धक्का, आयपीएल समितीने ठोठावला 12 लाखांचा दंड…

IPL 2024 (#CSKvsGT Match 7) :- आयपीएल स्पर्धेत मंगळवारी गुजरात टायटन्स संघाला चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पराभवाचा धक्का बसला. त्यातच षटकांची गती योग्य न राखल्यामुळे गुजरातचा कर्णधार शुभमन गिल याला १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात गुजरातचा ६३ धावांनी पराभल झाला होता. यंदाच्या आयपीएलमधील हा गुजरातचा पहिला पराभव आहे. मात्र, पराभवानंतर गुजरातला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. कर्णधार गिलवर १२ लाखाचा दंड ठोठावण्यात आला आहे. या सामन्यात गुजरातकडून षटकांची गती कमी राखली गेल्याने ही कारवाई करण्यात आली आहे .
आयपीएल समितीने दिलेल्या माहितीनुसार गुजरात टायटन्सने आयपीएलच्या आचार संहितेतील नियमाचा भंग करण्याची ही १७ व्या आयपीएल हंगामातील पहिलीच वेळ आहे. त्यामुळे गिलवर कर्णधार म्हणून १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. नियमानुसार ९० मिनिटांच्या आत संघाला २० षटके पूर्ण करावी लागतात.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/ipl-2024-cskvsgt-match-7chennai-super-kings-beat-gujarat-titans-by-63-runs/
षटकांची गती कमी राखल्याची चूक पहिल्यांदा झाल्यास कर्णधारावर १२ लाखांचा दंड ठोठावला जातो. तसेच दुसऱ्यांदा अशी चूक झाल्यास कर्णधारावर २४ लाखांचा दंड आणि संघातील अन्य खेळाडूंवर ६ लाख किंवा सामना शुल्काच्या २५ टक्के रक्कम दंड ठोठावण्यात येतो. तसेच तर हीच चूक तिसऱ्यांदा झाली तर कर्णधाराला ३० लाखांचा दंड आणि एका सामन्याची बंदी अशी कारवाई केली जाते, याशिवाय संघातील खेळाडूंवर १२ लाखांचा किंवा सामना शुल्काच्या ५० टक्के, जी रक्कम कमी असेल, तो दंड ठोठावला जातो.





