IPL 2023 : केदार जाधवचं नशीब झळाकलं; ‘या’ संघाकडून मिळाली आयपीएल खेळण्याची संधी

मुंबई : सध्या आयपीएलचा २०२३ चा हंगाम जोरात सुरु आहे. अशातच भारतीय क्रिकेटर केदार जाधवची आयपीएलमध्ये लॉटरी लागली आहे.यंदाच्या आयपीएलच्या लिलावात केदारला कोणत्याही संघाने खरेदी केले नव्हते.
त्यामुळे आता केदार काही यापुढे आयपीएलमध्ये दिसणार नाही, यामुळे त्याचे चाहते देखील निराश झाले होते. पण कोणाचे नशिब कधी बदलेल हे कोणीच सांगू शकत नाही. हीच गोष्ट आता केदारच्या बाबतीत घडल्याचे पाहायला मिळाले आहे. त्याला सध्या सुरु असलेल्या आयपीएल मध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे.
आरसीबीने दिली संधी…
काही दिवसांपूर्वी आरसीबीचा खेळाडू डेव्हिड विली हा दुखापतग्रस्त झाला होता. त्याची दुखापत ही गंभीर स्वरुपाची होती. त्यामुळे आता तो आयपीएलमध्ये खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता डेव्हिड विलीच्या जागी आरसीबीकडून केदार जाधवची निवड करण्यात आली आहे. याबाबतची अधिकृत घोषणा आरसीबीने केली आहे.
दरम्यान, केदार जाधवसाठी ही एक चांगली संधी चालून आली आहे. कारण अजिंक्य रहाणे संपला अशी ओरड काही दिवसांपूर्वी सुरु होती, पण त्याला अजिंक्यने आता भन्नाट उत्तर दिले आहे.त्यामुळे केदार जाधव देखील मिळालेल्या संधीचे सोनं करेल का? हे बघणं महत्वाचे ठरेल.





