Internet In Flight : विमान प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; आता विमानातही मिळणार मोफत इंटरनेट

Internet In Flight – इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनने अमेरिकन उद्योगपती एलोन मस्क यांच्या मालकीच्या स्पेसएक्स फाल्कन९ या रॉकेटच्या मदतीने प्रथमच आपला संचार उपग्रह प्रक्षेपित केला. सोमवार-मंगळवारच्या मध्यरात्री या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले. यामुळे दुर्गम भागात ब्रॉडबँड सेवा उपलब्ध होणार आहे. याशिवाय प्रवाशांना फ्लाइटमध्ये इंटरनेट सुविधाही मिळणार आहे.
इस्रोने या दळणवळण उपग्रहाला जीसॅट-एन-२ असे नाव दिले आहे. जीसॅट-एन-२ चे मिशन लाइफ १४ वर्षे आहे. 4700 किलो वजनाचा हा व्यावसायिक उपग्रह केप कॅनवेरल, फ्लोरिडा, यूएसए येथील स्पेस कॉम्प्लेक्स 40 येथून प्रक्षेपित केला जाईल. स्पेसएक्क्सने हा लॉन्च पॅड अमेरिकी स्पेस फोर्सकडून भाड्याने घेतला आहे.
उपग्रह प्रक्षेपित होण्यापूर्वीच भारतीय अंतराळ संस्थेचे अधिकारी फ्लोरिडातील केप कॅनवेरल येथे तैनात आहेत. त्यांनी डेडिकेटेड लॉन्चिंगची मागणी केली आहे. म्हणजेच या प्रक्षेपणात एकही सह-उपग्रह नसेल.
यूआर राव सॅटेलाइट सेंटर, बेंगळुरूचे संचालक डॉ. एम. शंकरन म्हणाले, एकदा हा स्वदेशी उपग्रह कार्यान्वित झाला की, तो जागतिक इंटरनेट नकाशावर भारतातील इन-फ्लाइट इंटरनेट कनेक्टिव्हिटीची मोठी पोकळी भरून काढेल.” ते पुढे म्हणाले, “हा भारताचा सर्वात सक्षम उपग्रह आहे. बहुप्रतिक्षित का-बँडमध्ये केवळ काम करणारा कदाचित एकमेव उपग्रह आहे.
जीसॅट-एन-२ ची वैशिष्ट्ये
१. जीसॅट-एन-२ उपग्रहाची खास रचना दुर्गम भागातील दळणवळण प्रणाली सुधारण्यासाठी करण्यात आली आहे. यामुळे दुर्गम भागात ब्रॉडबँड इंटरनेट सुविधा उपलब्ध होईल. हा उपग्रह 48 जीबीपीएसच्या वेगाने इंटरनेट प्रदान करेल.
२. हा उपग्रह अंदमान-निकोबार बेटे, जम्मू-काश्मीर आणि लक्षद्वीपसह दुर्गम भारतीय भागात दळणवळण सेवा पुरवेल.
३. यामध्ये 32 अरुंद स्पॉट बीम असतील. 8 बीम ईशान्य क्षेत्रासाठी असतील, तर 24 रुंद बीम उर्वरित भारतासाठी समर्पित आहेत. या 32 बीमना भारतीय हद्दीत असलेल्या हब स्टेशन्सकडून समर्थन मिळेल. पेलोड क्षमता अंदाजे ४८ जीबी प्रति सेकंद आहे. यामुळे देशातील दुर्गम गावे इंटरनेटशी जोडली जातील.
४. जीसॅट-एन-२ ची -80% क्षमता एका खासगी कंपनीला विकली गेली आहे. उर्वरित 20% विमानसेवा आणि सागरी क्षेत्रातील खाजगी कंपन्यांनाही विकले जातील.
५. हा उपग्रह केंद्राच्या ‘स्मार्ट सिटी’ उपक्रमाला चालना देईल. तसेच फ्लाइटमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी सोयीस्कर बनविण्यात मदत होईल.





