International Yoga Day : रेसिडेन्शीअल हायस्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
भारताने योग अभ्यासाच्या रूपाने जगाला एक अनमोल देणगी दिली आहे. आरोग्याच्या दृष्टीकोनातून योगासने (International Yoga Day) फार महत्वाची आहेत हे शास्त्राने देखील सिद्ध केले आहे.

International Yoga Day : भारताने योग अभ्यासाच्या रूपाने जगाला एक अनमोल देणगी दिली आहे. आरोग्याच्या दृष्टीकोनातून योगासने (International Yoga Day) फार महत्वाची आहेत हे शास्त्राने देखील सिद्ध केले आहे.
सध्याच्या दैनंदिन जीवनात ताणतणाव सहन करण्याची शक्ती कमी झाल्यामुळे आत्महत्येचे (International Yoga Day) प्रमाण वाढत आहे. अशा वेळी मन: शांतीसाठी योगासने करणे अत्यंत गरजेचे आहे. असे आवाहन माजी क्रीडाशिक्षक बबनराव धावणे यांनी केले.
२१ जून रोजी जागतिक योगदिनाचे (International Yoga Day) औचित्य साधून येथील रेसिडेन्शीअल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, रेसिडेन्शीअल इंग्लिश मेडीअम स्कूल आणि गुड मॉर्निंग क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यालयाच्या मैदानावर आंतरराष्ट्रीय योगदिनाचे भव्य आयोजन करण्यात आले या प्रसंगी ते बोलत होते.
धावणे पुढे म्हणाले , “योगाच्या माध्यमातून माणसाची शारीरिक आणि मानसिक तयारी होते. मन अत्यंत चंचल असून, त्याला स्थिर करणे आवश्यक आहे. स्वतः आनंदी राहणे, निरोगी राहणे आणि मन शांत ठेवणे या गोष्टी योगासनांमुळे साध्य होतात. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर योग अभ्यास महत्त्वाचा आहे.”
यावेळी विद्यालयातील इयत्ता ५ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांनी विविध योगासने (International Yoga Day) केली. धावणे यांनी स्वतः ओंकार, भ्रामरी, अनुलोम-विलोम, वज्रासन आदी आसनांची माहिती देऊन त्याचे शरीराला होणारे फायदे सांगून प्रात्यक्षिके सादर केली.प्राचार्य बालाजी गायकवाड यांनी तसेच विद्यालयातील सर्व शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यां समवेत योगासनांच्या प्रात्यक्षिकांत सहभाग घेतला.






