Indapur News : लाखेवाडीत जागतिक योग दिन उत्साहात साजरा

इंदापूर : जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने दि. 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन व जागतिक संगीत दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
योग दिनाची सुरुवात महर्षी पतंजली यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. योगा शिक्षक नितीन बांगर यांनी विद्यार्थ्यांना मानवी जीवनात असणारी योगाची माहिती सांगितली विद्यार्थ्यांकडून सूर्यनमस्कार, प्राणायाम व विविध आसनांचे प्रकार करून घेतले.
सुरुवातीला योग प्रार्थना, ओंकार, योगासन, ध्यान, सूर्यनमस्कार इत्यादी योग प्रकार करून घेतले. संगीत दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी ‘सत्यम शिवम सुंदरा’ ही प्रार्थना अतिशय लयबद्ध व सुरेल आवाजात म्हटली.
विद्यार्थ्यांचा ताण तणाव दूर करण्यासाठी विविध मनोरंजनात्मक खेळाचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये विद्यार्थ्यांना गाण्याचे पार्श्व संगीत ऐकवले जात होते व त्या गाण्याचे बोल किंवा नाव ओळखायला सांगितले जात होते. जो विद्यार्थी गाण्याचे बोल अचूक ओळखेल त्याला बक्षीस देण्यात आले.
करा योग रहा निरोग या उक्तीप्रमाणे सर्वांनी विविध प्रकारची योगासने करून आपले आरोग्य सुव्यवस्थित राखावे. अशी धारणा असणारे संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष श्रीमंत ढोले, उपाध्यक्ष चित्रलेखा ढोले, सचिव हर्षवर्धन खाडे, मुख्य सल्लागार प्रदीप गुरव यांनी सर्वांनाच योग दिनानिमित्त आरोग्यमय शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रमासाठी विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य गणेश पवार, प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य राजेंद्र सरगर, सर्व विभागाचे सुपरवायझर शिक्षक, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.





