LPG Gas : गॅस सिलिंडवर मिळतो लाखोंचा विमा; अपघात झाल्यास किती नुकसान भरपाई मिळते? वाचा संपूर्ण माहिती….

LPG Gas Insurance : आपण एलपीजी गॅस कनेक्शन खरेदी करतो, गॅस आपल्या घरी येतो आपण नियमित सिलिंडर घेतो या सगळ्या व्यवहारात आपल्या नावाने एक विमा निघालेला आहे याची कुणालाच कल्पना नसते. घरगुती गॅस कनेक्शन घेतल्यानंतर पेट्रोलियम कंपन्या ग्राहकांना पर्सनल अॅक्सिडेंट कव्हर देतात.
एखाद्याच्या लहानशा चुकीमुळे मोठी दुर्घटना घडू शकते. गॅस सिलेंडरबाबत दुर्घटना घडल्यास आपल्याला नुकसान भरपाई मिळू शकते. घरगुती गॅस कनेक्शन घेतल्यानंतर कंपन्या ग्राहकांना पर्सनल अॅक्सिडेंट कव्हर देतात. याच्या मदतीने तुम्ही नुकसान भरपाई घेऊ शकता. त्यासाठी काही सोप्या स्टेप्स आहेत. त्या तुम्हाला फॉलो कराव्या लागतील.
स्वयंपाकाच्या गॅसचा आपल्या घरात अपघात, स्फोट वगैरे झाला तर आपण काय करतो? आपण उपचारांचा घरदुरूस्तीचा सगळा खर्च करतो कारण आपला विमा आहे याचा आपल्याला पत्ताच नसतो.
अपघाताच्या वेळी जर तो अपघात सदोष गॅस वितरका यंत्रणेमुळे अपघात घडला असेल तर चाळीस लाखापर्यंत नुकसान भरपाई मिळू शकते. जर नुकसान मोठ्या प्रमाणावर असेल तर भरपाईची रक्कम 50 लाखापर्यंतही जाऊ शकते.
ही माहिती ना सरकार आपल्याला देत ना गॅस कंपन्या जर चुकून कघी असा प्रसंग ओढवलाच तर गॅस कंपनीकडे विमा मागायला विसरू नका. जर आपल्या गॅस सिलेंडरची एक्सपायरी डेट संपली असेल तर तो गॅस सिलेंडर म्हणजे आपल्या घरात जिवंत बाॅम्ब असल्या सारखे आहे.
एलपीजी सिलेंडरमुळे गॅस लिकेज किंवा ब्लास्ट झाल्यास आर्थिक मदत दिली जाते. या विम्यासाठी पेट्रोलियम कंपन्यांची विमा कंपन्यांशी भागीदारी आहे. गॅस सिलेंडर घेताना काही गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे.
विमा कव्हर झाला आहे की नाही, गॅस सिलेंडरची एक्सपायरी डेट तपासणं गरजेचं आहे. नेहमी एक्सपायरी डेट पाहून सिलेंडर घेणं आवश्यक आहे, कारण इन्शुरन्स सिलेंडरच्या एक्सपायरी डेटशी लिंक असतो.
एलपीजी विमा पॉलिसीद्वारे विम्यासाठी क्लेम करता येतो. यात गॅस सिलेंडरचा ब्लास्टमुळे व्यक्ती जखमी झाल्यास किंवा मृत्यू झाल्यास क्लेम कव्हर केला जातो. एलपीजी सिलेंडरवर दिला जाणारा विमा क्लेम करण्यासाठी सरकारी वेबसाइट https://www.mylpg.in/docs/Public_Liability_Insurance_policies_for_accidents_involvin_LPG.pdf वर माहिती घेता येईल.
याचा तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो. त्यामुळे नवीन गॅस कनेक्शन घेणारा विमा आहे का नाही? याच खात्री आणि संपूर्ण माहिती करूनच नवीन गॅस आपल्या घरात ठेवावा.





