Replace Image Backgrounds Using AI : मेटा-(Meta)मालकीचे सोशल मीडिया अॅप इंस्टाग्राम (Instagram) आणखी एक मोठे अपडेट रिलीज करणार आहे. इंस्टाग्रामच्या या नवीन अपडेटनंतर, वापरकर्ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या मदतीने पार्श्वभूमी प्रतिमा (Background Image) बदलण्यास सक्षम असतील, परंतु सध्या या वैशिष्ट्याची (feature) चाचणी (Testing) केली जात आहे.
इंस्टाग्रामच्या या नवीन फीचरला ‘बॅकड्रॉप’ (Backdrop) असे नाव देण्यात आले आहे. मेटाच्या जनरेटिव्ह एआयचे प्रमुख अहमद अल ढाले (Ahmad Al-Dhale) यांनी ही माहिती दिली आहे. सध्या, बॅकड्रॉप फीचर फक्त अमेरिकेतील (US) वापरकर्त्यांसाठी (Users) उपलब्ध आहे.
या फीचरच्या मदतीने यूजर्स एका टॅपमध्ये बॅकग्राउंड इमेज बदलू शकतील. यासाठी इतर कोणत्याही स्टॉक इमेजची आवश्यकता नाही. बॅकग्राउंड इमेज बदलण्यासाठी, यूजर्संना इतर एआय टूल्सप्रमाणे येथे एक प्रॉम्प्ट (prompts) द्यावा लागेल.
Phone Tips : मोबाईलवर दिसणाऱ्या जाहिरातींमुळे हैराण आहात का? 3 क्लिकमध्ये Ads करा बंद, पाहा स्टेप्स…
उदाहरणार्थ, जर तुम्हाला बॅकग्राउंडमध्ये (Background Image) डायनासोरची प्रतिमा (image) हवी असेल, तर तुम्ही चेस्ड बाय डायनासोर(chased by dinosaurs) किंवा जर तुम्हाला बॅकग्राउंडमध्ये (Background Image) लहान कुत्र्यांच्या पिल्लं हवी असेल तर तुम्ही (Surrounded by puppies) प्रॉम्प्ट (prompt) वापरू शकता. याशिवाय तुम्ही तुमच्या गरजेनुसार प्रॉम्प्ट वापरू शकता.
WhatsApp Channel : तुमचंही व्हॉट्सॲप चॅनल आहे का? कंपनी आणतेय 3 नवीन फीचर्स! जाणून घ्या…डिटेल्स
नवीन अपडेटनंतर युजर्सना स्टोरी शेअर करताना ट्राय इट (Try it,वापरून पहा) चा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला बॅकग्राउंड इमेज (background image) बदलण्याचा पर्याय मिळेल. नवीन फीचरबद्दल असा दावा केला जात आहे की, AI व्दारा बदललेली पार्श्वभूमी प्रतिमा (background image) अतिशय अचूकaccurate आणि प्रोफेशनल professional असेल.