Petrol Diesel Price Hike: महागाईचा भडका! पेट्रोल आणि डिझेल पुन्हा महागले, नवे दर जाणून घ्या…
Petrol Diesel Price Hike: आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या तणावाचा थेट परिणाम भारतीयांच्या खिशावर

Petrol Diesel Price Hike: महागाईच्या झळा सोसणाऱ्या सर्वसामान्यांना आज पुन्हा एकदा मोठा झटका बसला आहे. देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दुसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे.
यापूर्वी 15 मे रोजी पेट्रोलच्या दरात 3 रुपये आणि डिझेलच्या दरात 3.11 रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता चार दिवसांतच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दुसऱ्यांदा वाढ झाली आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये आज, १९ मे पासून पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्रात पेट्रोल प्रति लिटर ९१ पैशांनी महागले आहे. तर डिझेल प्रति लिटर ९४ पैशांनी महागले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या प्रचंड तणावाचा थेट परिणाम आता भारतीयांच्या खिशावर होऊ लागला आहे.
देशातील प्रत्येक शहरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वेगवेगळी वाढ झाली आहे. त्यानुसार दिल्लीत पेट्रोलच्या दरात 87 पैसे आणि डिझेलच्या दरात 91 पैशांची वाढ करण्यात आली आहे.
त्यामुळे पेट्रोलचा प्रतिलीटर दर 107 रुपयांच्या पलीकडे जाऊन पोहोचला आहे. तर डिझेल प्रतिलीटर 94 रुपयांच्या टप्प्याजवळ येऊन पोहोचले आहे. मंगळवारी सकाळपासून हे नवे दर लागू झाले आहेत. Petrol Diesel Price Hike
दरवाढ होण्यामागचं कारण काय?
जागतिक तेल बाजारातील अनिश्चिततेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रेंट क्रूडच्या किमती प्रति बॅरल १०० डॉलर्सच्या पार गेले आहेत. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या भू-राजकीय तणावामुळे जागतिक क्रूड पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून त्याचा थेट परिणाम भारतावर होत आहे. ज्याची झळ सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.
पेट्रोल-डिझेल महागल्यामुळे मालवाहतुकीचा खर्च वाढणार आहे. परिणामी येत्या काळात भाजीपाला, दूध आणि इतर जीवनावश्यक वस्तूही महागण्याची शक्यता असून, याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या बजेटवर होणार आहे. Petrol Diesel Price Hike
लक्षवेधी : परकीय चलनसाठा बचाव!
आठवड्याभरात ३.९० रुपयांची वाढ
नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांनंतर इंधन दरवाढ होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. त्यानुसार आता पेट्रोलियम कंपन्यांनी दरवाढ केली असून शुक्रवारी ३ रुपयांची वाढ केल्यानंतर आज ९० पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे अवघ्या एका आठवड्यात प्रतिलिटर ३ रुपये ९० पैशांची वाढ झाली आहे. Petrol Diesel Price Hike
पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर
- दिल्लीत पेट्रोल ८७ पैशांनी महाग झाले असून ते ९८.६४ रुपये प्रति लिटरवर पोहचले आहे.
- डिझेलच्या दरातही ९१ पैशांची वाढ झाली असून ९१.५८ रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे.
- मुंबईत पेट्रोल ९१ पैशांनी वाढून १०७.५९ रुपये प्रति लिटर झाले आहे.
- डिझेल ९४ पैशांनी वाढून ९४.०८ रुपये प्रति लिटर झाले आहे.
- कोलकातामध्ये पेट्रोलमध्ये सर्वाधिक ९६ पैशांची वाढ झाली असून ते १०९.७० रुपये प्रति लिटर झाले आहे.
- डिझेल ९४ पैशांनी वाढून ९६.०७ रुपये प्रति लिटर झाले आहे.
- चेन्नईमध्ये पेट्रोल ८२ पैशांनी महाग होऊन १०४.४९ रुपये प्रति लिटर झाले आहे.
- डिझेल ८६ पैशांनी वाढून ९६.११ रुपये प्रति लिटर झाले आहे.






