INDW vs WIW 1st ODI : मंधनाची पुन्हा एकदा दमदार खेळी, टीम इंडियानं वेस्ट इंडिजसमोर ठेवलं भलंमोठं लक्ष्य…

INDW vs WIW 1st ODI : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला वनडे सामना बडोद्यात खेळवला जात आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिज संघाची कर्णधार हेली मॅथ्यूजने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र तो महागात पडला. कारण, प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने 50 षटकांत 9 गडी गमावून 314 धावा केल्या आहेत.
भारताकडून सलामीवीर स्मृती मंधनाने 102 चेंडूत 91 धावांची खेळी केली. तिने आपल्या खेळीत 13 चौकार मारले. वास्तविक स्मृती मंधानाचे शतक हुकले असले तरी, या खेळीमुळे भारतीय संघ मोठी धावसंख्या उभारण्यात यशस्वी ठरला आहे.
Innings Break!
A 91(102) from Smriti Mandhana inspired #TeamIndia to set a target of 315 🎯 👌
Second innings coming up shortly 👍
Updates ▶️ https://t.co/OtQoFnoAZu#TeamIndia | #INDvWI | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/XftLTVS7aj
— BCCI Women (@BCCIWomen) December 22, 2024
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली. भारतासाठी सलामीवीर स्मृती मंधना आणि प्रतिका रावल यांनी पहिल्य विकेटसाठी 23.2 षटकात 110 धावा जोडल्या. प्रतिका रावल 69 चेंडूत 40 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. यानंतर हरलीन देओल फलंदाजीला आली आणि तिने 50 चेंडूत 44 धावा केल्या. तर भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर 23 चेंडूत 34 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. त्यानंतर भारतीय संघाची यष्टिरक्षक फलंदाज ऋचा घोषने शेवटच्या षटकांमध्ये 13 चेंडूत 26 धावांची तर अष्टपैलू दीप्ती शर्माने 12 चेंडूत 14 धावांची खेळी केली.
वेस्ट इंडिजसाठी गोलंदाजीत जैदा जेम्स ही सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली. जेम्स हिने 8 षटकांत 45 धावांत 5 फलंदाज बाद केले. याशिवाय कॅरेबियन कर्णधार हेली मॅथ्यूजला 2 यश मिळाले. डिआंड्रा डॉटिनने 1 बळी घेतला.
दरम्यान, भारतीय संघाने याआधी 3 टी-20 सामन्यांच्या मालिकेत वेस्ट इंडिजचा 2-1 ने पराभव केला होता. मात्र, आता दोन्ही संघ एकदिवसीय मालिकेत आमनेसामने आहेत. यानंतर 24 डिसेंबर रोजी दोन्ही संघ दुसऱ्या वनडेसाठी आमनेसामने येतील.





