\n

ताहिला मॅकग्राने केल्या सर्वाधिक धावा…

\n

ऑस्ट्रेलियाची सलामीवीर बेथ मुनी आणि फोबी लिचफिल्ड यांनी पहिल्या विकेटसाठी 49 धावांची भागीदारी केली. बेथ मुनी 33 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. फोबी लिचफिल्डने 18 धावा केल्या. यानंतर एलिस पेरीने 45 धावांची चांगली खेळी केली. ताहिला मॅकग्राने 73 धावांचे योगदान दिले. त्याचवेळी भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरच्या चेंडूवर अ‍ॅलिसा हीली 32 धावा करून बाद झाली. सध्या ऑस्ट्रेलियाच्या आशा अॅनाबेल सदरलँड आणि अॅशले गार्डनर यांच्यावर टिकून आहेत. त्याचवेळी, स्नेह राणा आणि हरमनप्रीत कौर यांनी आतापर्यंत भारतासाठी 2-2 यश मिळवले आहे. ऑस्ट्रेलियाची सलामीवीर बेथ मुनीला रिचा घोषने धावबाद केले.

\n

AUS-W Vs IND-W Test Day 3 : रिचा घोषचा अफलातून थ्रो अन् बेथ मुनी झाली अशा प्रकारे धावबाद, एकदा Video पाहाच…

\n

\n

टीम इंडियाला पहिल्या डावात 187 धावांची आघाडी…

\n

पहिल्या डावात ऑस्ट्रेलियन संघाला 219 धावांत गुंडाळल्यानंतर भारतीय संघाने पहिल्या डावात 406 धावा केल्या. अशा प्रकारे टीम इंडियाला पहिल्या डावात 187 धावांची आघाडी मिळाली.

\n

AUS-W Vs IND-W Test Day 3 : टीम इंडियाला पहिल्या डावात 187 धावांची आघाडी…

\n

\n

भारताने सात विकेट्सवर 376 धावांवरून तिसऱ्या दिवसाची सुरुवात केली आणि 30 धावा जोडण्यासाठी उर्वरित तीन विकेट गमावल्या. शनिवारी पूजा वस्त्राकरच्या रूपाने भारताला पहिला धक्का बसला. दिवसाच्या चौथ्या षटकात सदरलँडने पूजाला किम गर्थकरवी झेलबाद केले. तिचे अर्धशतक हुकले. पूजा 126 चेंडूंत सात चौकारांच्या मदतीने 47 धावा करून बाद झाली. तिने दीप्तीसोबत आठव्या विकेटसाठी 122 धावांची भागीदारी केली.

\n

यानंतर दीप्तीही लगेचच माघारी परतली. 171 चेंडूंत नऊ चौकारांच्या मदतीने 78 धावा करून ती बाद झाली. तिला किम गर्थने बाद केले. यानंतर रेणुका सिंग गार्डनरच्या हाती सदरलँडकरवी झेलबाद झाली आणि भारताचा डाव 406 धावांवर संपला. रेणुकाने आठ धावा केल्या. आॅस्ट्रेलियाकडून गोलंदाजीत गार्डनरने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. त्याचवेळी गार्थ आणि सदरलँडने प्रत्येकी दोन गडी बाद केले. जेस जोनासेनला एक विकेट मिळाली.
\nदुसऱ्या दिवसअखेर होती 157 धावांची आघाडी…

\n

दरम्यान, ऑस्ट्रेलियन संघाला 219 धावांत गुंडाळल्यानंतर भारतीय संघाने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा पहिल्या डावात 157 धावांची आघाडी घेतली होती. दुस-या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने सात गड्यांच्या मोबदल्यात 376 धावा केल्या होत्या.

\n

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव…

\n

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 219 धावांवर आटोपला. बेथ मूनीने 40, ताहिला मॅकग्राने 50 आणि कर्णधार अॅलिसा हिलीने 38 धावा केल्या. याशिवाय किम गर्थ 28 धावा करून नाबाद राहिली. सदरलँड 16 धावा केल्यानंतर, गार्डनर 11 धावा केल्यानंतर, जोनासेन 19 धावा केल्यानंतर, लॉरेन चीटल सहा धावा केल्यानंतर आणि अलाना किंग पाच धावा करत बाद झाले. फोबी लिचफिल्डला खातेही उघडता आले नाही, तर एलिस पेरी चार धावा करून बाद झाली. भारताकडून पूजा वस्त्राकरने चार विकेट घेतल्या. तर स्नेह राणाने तीन गडी बाद केले. दीप्ती शर्माने दोन गडी बाद केले.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"AUS-W Vs IND-W Test Day 3 Stumps : तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी रोमांचक वळणावर…","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/12/Team-india-6.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/swapnilhajareeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/indw-vs-ausw-the-match-reached-an-exciting-turn-on-the-third-day-of-the-game-will-team-india-win-the-test#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/12/Team-india-6.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/indw-vs-ausw-the-match-reached-an-exciting-turn-on-the-third-day-of-the-game-will-team-india-win-the-test#webpage","name":"AUS-W Vs IND-W Test Day 3 Stumps : तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी रोमांचक वळणावर…","url":"https://www.dainikprabhat.com/indw-vs-ausw-the-match-reached-an-exciting-turn-on-the-third-day-of-the-game-will-team-india-win-the-test","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/indw-vs-ausw-the-match-reached-an-exciting-turn-on-the-third-day-of-the-game-will-team-india-win-the-test#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/12/Team-india-6.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/indw-vs-ausw-the-match-reached-an-exciting-turn-on-the-third-day-of-the-game-will-team-india-win-the-test#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/indw-vs-ausw-the-match-reached-an-exciting-turn-on-the-third-day-of-the-game-will-team-india-win-the-test","name":"AUS-W Vs IND-W Test Day 3 Stumps : तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी रोमांचक वळणावर…"}}]}}}

AUS-W Vs IND-W Test Day 3 Stumps : तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी रोमांचक वळणावर…