India Women vs Australia Women One-Off Test Day 3 | मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला संघांमध्ये एकमेव कसोटी खेळली जात आहे. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियन संघाला 219 धावांत गुंडाळल्यानंतर भारतीय संघाने पहिल्या डावात 406 धावा केल्या. अशा प्रकारे टीम इंडियाला पहिल्या डावात 187 धावांची आघाडी मिळाली आहे. सध्या ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव सुरू आहे.
Innings Break!
A solid batting performance from #TeamIndia to secure a 1⃣8⃣7⃣-run lead! 💪💪
Over to our bowlers now 👍 👍
Scorecard ▶️ https://t.co/8qTsM8XSpd#INDvAUS | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/1OpAn5xBRh
— BCCI Women (@BCCIWomen) December 23, 2023
भारताने सात विकेट्सवर 376 धावांवरून तिसऱ्या दिवसाची सुरुवात केली आणि 30 धावा जोडण्यासाठी उर्वरित तीन विकेट गमावल्या. शनिवारी पूजा वस्त्राकरच्या रूपाने भारताला पहिला धक्का बसला. दिवसाच्या चौथ्या षटकात सदरलँडने पूजाला किम गर्थकरवी झेलबाद केले. तिचे अर्धशतक हुकले. पूजा 126 चेंडूंत सात चौकारांच्या मदतीने 47 धावा करून बाद झाली. तिने दीप्तीसोबत आठव्या विकेटसाठी 122 धावांची भागीदारी केली.
यानंतर दीप्तीही लगेचच माघारी परतली. 171 चेंडूंत नऊ चौकारांच्या मदतीने 78 धावा करून ती बाद झाली. तिला किम गर्थने बाद केले. यानंतर रेणुका सिंग गार्डनरच्या हाती सदरलँडकरवी झेलबाद झाली आणि भारताचा डाव 406 धावांवर संपला. रेणुकाने आठ धावा केल्या. आॅस्ट्रेलियाकडून गोलंदाजीत गार्डनरने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. त्याचवेळी गार्थ आणि सदरलँडने प्रत्येकी दोन गडी बाद केले. जेस जोनासेनला एक विकेट मिळाली.
दुसऱ्या दिवसअखेर होती 157 धावांची आघाडी…
दरम्यान, ऑस्ट्रेलियन संघाला 219 धावांत गुंडाळल्यानंतर भारतीय संघाने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा पहिल्या डावात 157 धावांची आघाडी घेतली होती. दुस-या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने सात गड्यांच्या मोबदल्यात 376 धावा केल्या होत्या.
ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव…
ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 219 धावांवर आटोपला. बेथ मूनीने 40, ताहिला मॅकग्राने 50 आणि कर्णधार अॅलिसा हिलीने 38 धावा केल्या. याशिवाय किम गर्थ 28 धावा करून नाबाद राहिली. सदरलँड 16 धावा केल्यानंतर, गार्डनर 11 धावा केल्यानंतर, जोनासेन 19 धावा केल्यानंतर, लॉरेन चीटल सहा धावा केल्यानंतर आणि अलाना किंग पाच धावा करत बाद झाले. फोबी लिचफिल्डला खातेही उघडता आले नाही, तर एलिस पेरी चार धावा करून बाद झाली. भारताकडून पूजा वस्त्राकरने चार विकेट घेतल्या. तर स्नेह राणाने तीन गडी बाद केले. दीप्ती शर्माने दोन गडी बाद केले.