#INDvAFG 3rd T20 : दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये टीम इंडियाचा विजय, तिसऱ्या सामन्यासह 3-0 ने मालिकाही घातली खिशात…

India vs Afghanistan 3rd T20 2024, Live Cricket Score : तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारताने अफगाणिस्तानचा 3-0 ने पराभव केला आहे. पहिला आणि दुसरा T20 प्रत्येकी सहा विकेट्सने जिंकल्यानंतर टीम इंडियाने तिसऱ्या T20 मध्ये अफगाणिस्तानचा डबल सुपर ओव्हरमध्ये पराभव केला. दोन्ही संघांना 20-20 षटकांत 212-212 धावा करता आल्या. यानंतर पहिल्या सुपर ओव्हरमध्ये दोन्ही संघांना 16-16 धावा करता आल्या. त्यानंतर दुहेरी सुपर ओव्हरमध्ये भारताने प्रथम फलंदाजी करत 11 धावा केल्या. त्यानंतर अफगाणिस्तान संघाने तीन चेंडूत दोन विकेट गमावल्या आणि त्यामुळे टीम इंडियाचा विजय झाला. भारताने दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये अफगाणिस्तानचा 10 धावांनी पराभव करत तिसरा टी-20 जिंकला.
अशा प्रकारे भारतीय संघाने मालिका 3-0 ने जिंकली. भारताने टी-20 आंतरराष्ट्रीय स्पर्धेत 9व्यांदा कोणत्याही संघाला क्लीन स्वीप केले आहे. यासह भारताने सर्वाधिक क्लीन स्वीप करण्याचा विक्रम केला.
T20 मध्ये सर्वाधिक क्लीन स्वीप करणारे संघ…
भारत- 9
पाकिस्तान- 8
इंग्लंड – 4
ऑस्ट्रेलिया- 3
न्यूझीलंड- 3
दक्षिण आफ्रिका – 3
A tied match 😮
A tied Super Over 😱India win the second Super Over to seal a 3-0 whitewash 🙌#INDvAFG 📝: https://t.co/DWK9Rn6PsN pic.twitter.com/gvQGEJVHMC
— ICC (@ICC) January 17, 2024
सामना बरोबरीत..
तत्पूर्वी, भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिसर्या T20 मधील सामना रोमहर्षक झाला. नाणफेक जिंकून भारताने प्रथम 212 धावा केल्या आणि त्यानंतर प्रत्युत्तरात अफगाणिस्ताननेही 212 धावा केल्या आणि सामना बरोबरीत राहिला.
#INDvAFG 3rd T20 : तिसरा टी-20 टाय, आता सुपर ओव्हरव्दारे सामन्याचा निकाल…
पहिली सुपरओव्हर…
यानंतर सामना सुपरओव्हरमध्ये पोहचला. यादरम्यान अफगाणिस्तान संघाने सुपर ओव्हरमध्ये 16 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतानेही केवळ 16 धावा केल्या आणि सुपर ओव्हरही टाय झाली. त्यानंतर पुन्हा सुपर ओव्हर खेळवण्यात आली.
#INDvAFG 3rd T20 : सुपरओव्हरही बरोबरीत, आता पुन्हा 6-6 चेंडूंचा सामना..
दुसरी सुपरओव्हर…
दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये भारताने केवळ 11 धावांवर आपले दोन्ही विकेट गमावले. भारतीय संघ पूर्ण 6 चेंडूही खेळू शकला नाही. त्यामुळे अफगाणिस्तानसमोर विजयासाठी 6 चेंडूत 12 धावा आव्हान होते. प्रत्युत्तरात अफगाणिस्तान संघाने तीन चेंडूत दोन विकेट गमावल्या आणि त्यामुळे टीम इंडियाचा विजय झाला.
#INDvAFG 3rd T20 : चिन्नास्वामीमध्ये रोहित-रिंकूचे तुफान, भारताचा अफगाणिस्तानसमोर धावांचा डोंगर…
रवी बिश्नोईची सुपर कामगिरी…
दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये रवी बिश्नोई गोलंदाजीसाठी आला आणि अफगाणिस्तान संघ त्याच्या फिरकीत अडकला. त्याने अवघ्या तीन चेंडूत मोहम्मद नबी आणि रहमानउल्ला गुरबाज यांचे दोन बळी घेतले. सुपर ओव्हरमध्ये, एक संघ दोन विकेट गमावतो तेव्हा डाव संपतो.





