India vs Afghanistan 1st T20 Match Live Cricket Score (मोहाली) :- महंमद नबीसह प्रमुख फलंदाजांनी केलेल्या उपयुक्त खेळीसह तळात नजीब झद्रानने केलेल्या आक्रमक फटकेबाजीच्या जोरावर अफगाणिस्तानने यजमान भारतासमोर पहिल्या टी-20 सामन्यात विजयासाठी 159 धावा करण्याचे माफक आव्हान ठेवले. अफगाणिस्तानने 20 षटकांत 5 गडी गमावून 158 धावा केल्या.
भारतीय संघात परतलेला नियमित कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकत अफगाणिस्तानलापहिल्यांदा फलंदाजी दिली. मात्र, भारताच्या सुरुवातीच्या षटकांत अर्शदीप सिंग व मुकेश कुमार फारसे प्रभावी ठरले नाहीत. त्याचा लाभ घेत अफगाणिस्तानचा कर्णधार इब्राहीम झद्रानने दुसरा सलामीवीर रेमनुल्लाह गुरबाजच्या साथीत संघाला अर्धशतकी सलामी दिली. ही जोडी धोकादायक ठरणार असे वाटत असतानाच अक्सर पटेलने गुरबाजला 23 धावांवर बाद केले. त्याने या खेळीत 28 चेडूत 2 चौकार व 1 षटकार मारला. पाठोपाठ कर्णधार झद्रानही 22 चेंडूत 2 चौकार व 1 षटकारासह 25 धावा काढून बाद झाला. त्याला शिवम दुबेने बाद केले.
Innings Break!
Afghanistan post 158/5 on the board.
2⃣ wickets each for @akshar2026 & Mukesh Kumar
1⃣ wicket for Shivam DubeOver to our batters now 👍 👍
Scorecard ▶️ https://t.co/BkCq71Zm6G#TeamIndia | #INDvAFG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/E9Nnsn6Xx4
— BCCI (@BCCI) January 11, 2024
एकदिवसीय सामन्यांची विश्वकरंडक स्पर्धा गाजवलेल्या रेहमत शाहचा अडसरही पटेलनेच लगेचच दूर केला. त्यानंतर मात्र, अजमतुल्लाह ओमरझाईने महंमद नबीच्या साथीत अर्धशतकी भागीदारी केली व संघाचे शतक फलकावर लावले. पटेलचा चार षटकांचा स्पेल संल्यावर या जोडीने आक्रमक फटकेबाजी करत भारतीय गोलंदाजांवर दडपण आणले. मात्र, मुकेश कुमारने परतीच्या स्पेलमध्ये ओमरझाईला तंबूचा रस्ता दाखवला. त्याने 22 चेंडूत 2 चौकार व 1 षटकार फटकावताना 29 धावा केल्या.
मुकेशने याच षटकांत अर्धशतकाकडे वाटचाल करत असलेल्या नबीला 42 धावांवर परत पाठवले. त्याने या खेळीत 27 चेंडूंचा सामना करताना 2 चौकार व 3 षटकार फटकावले. तळात नजीब झद्रानने आक्रमक फलंदाजी केल्याने त्यांना दीडशतकी धावांचा पल्ला पार करता आला. त्याला करीम जनतनेही सुरेख साथ दिली. झद्रानने 11 चेंडूत 4 चौकारांसह नाबाद 19 तर करीमने 5 चेंडूत 2 चौकारांसह नाबाद 9 धावा केल्या. भारताकडून अक्सर पटेल व मुकेश कुमार यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. शिवम दुबेने 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक – अफगाणिस्तान – 20 षटकांत 5 बाद 158 धावा. (महंमद नबी 42, अजमतुल्लाह ओमरझाई 29, इब्राहीम झद्रान 25, रेमनुल्लाह गुरबाज 23, नजीब झद्रान नाबाद 19, करीम जनत नाबाद 9, अक्सर पटेल 2-23, मुकेश कुमार 2-33, शिवम दुबे 1-9).