Sunil Gavaskar : सचिन तेंडुलकरसह ‘या’ दिग्गजांना क्रिकेट बोर्डावर घ्या; सुनील गावस्करांचा BCCI ला महत्त्वाचा सल्ला
Sunil Gavaskar : अशातच माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीच्या (CAC) कार्यपद्धतीवर महत्वाचे भाष्य केले आहे.

Sunil Gavaskar : नुकतीच भारतीय महिला संघाने ऐतिहासिक कामगिरी करत आशिया कपची ट्रॉफी जिंकली. पुरुष आणि महिला संघांच्या दमदार कामगिरीमुळे भारतीय क्रिकेटसाठी सुवर्णकाळ सुरू असल्याचं चित्र आहे. अशातच माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीच्या (CAC) कार्यपद्धतीवर महत्वाचे भाष्य केले आहे.
बीसीसीआयने क्रिकेट सल्लागार समितीच्या (CAC) भूमिकेचा आणि कार्यक्षेत्राचा पुनर्विचार करण्याची गरज असल्याचे गावस्कर यांनी म्हटले आहे. या समितीचा आवाका वाढवून त्यामध्ये भारतीय क्रिकेटमधील अनुभवी आणि दिग्गज माजी खेळाडूंचा समावेश करावा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
सध्या CAC मध्ये अशोक मल्होत्रा, जतिन परांजपे आणि सुलक्षणा नाईक यांचा समावेश आहे. मात्र, सचिन तेंडुलकरसारख्या अनुभवी खेळाडूला या समितीत स्थान मिळायला हवं, असे स्पष्ट मत सुनील गावस्कर यांनी व्यक्त केले आहे. (Sunil Gavaskar)
याशिवाय राहुल द्रविड, सौरव गांगुली, रवी शास्त्री, अनिल कुंबळे, हरभजन सिंग आणि वीरेंद्र सेहवाग या दिग्गजांच्या अनुभवाचा CACला फायदा होऊ शकतो, असेही त्यांनी म्हटले आहे. गावस्कर यांनी ‘डेली मेल’मधील आपल्या लेखातून या नावांचा उल्लेख केला आहे.
इतकंच नाही तर या दिग्गज माजी क्रिकेटपटूंसोबत बीसीसीआयचे अध्यक्ष आणि सचिव यांचाही या प्रक्रियेत सहभाग असावा, असा महत्वाचा सल्लाही सुनील गावस्कर यांनी दिला आहे. भारतीय क्रिकेटच्या सध्याच्या यशाच्या पार्श्वभूमीवर अनुभवी खेळाडूंच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा संस्थात्मक पातळीवर अधिक प्रभावी वापर व्हावा, अशी गावस्कर यांची भूमिका आहे.
सुनील गावस्कर यांनी घेतलेल्या या भूमिकेवर आता बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समिती काय स्टँन्ड घेणार का हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
नेमकं काय म्हणाले आहेत सुनील गावस्कर ? (Sunil Gavaskar)
आज बीसीसीआयमध्ये निवड समिती आणि सीएसी वगळता इतर कोणत्याही समित्या नाहीत. मला वाटते की सीएसीची व्याप्ती वाढवण्याची वेळ आली आहे. प्रशिक्षकांची निवड, तसेच देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय सामन्यांचे वेळापत्रक यांचाही विचार केला पाहिजे. काही अत्यंत अनुभवी माजी क्रिकेटपटू आहेत, ज्यांच्या कौशल्याचा समितीमध्ये उपयोग करून घेतला जाऊ शकतो.
“जेव्हा ही समिती प्रशिक्षक, कर्णधार आणि एनसीएच्या प्रमुखांशी बोलेल, तेव्हा तिचे महत्त्व आणखी वाढेल. महिला क्रिकेटमध्येही अशीच एक समिती असायला हवी, जिथे अनुभवी खेळाडू महिला क्रिकेटला पुढे नेण्यासाठी निर्णय घेतील. याचा नुसता विचार करूनही माझ्या अंगावर काटा येतो. हे कधी खरे होईल का, की हे फक्त एक स्वप्नच आहे?”
Meta: अखेर भारताच्या कारवाईपुढे ‘मेटा’ नमले ; ‘ती’ संपूर्ण माहिती देण्यास सहमत





