Sunil Gavaskar Slams : “त्या खेळाडूंना संघातून हाकला…”, झिम्बाब्वेविरुद्धच्या विजयानंतरही सुनील गावस्करांनी निवडकर्त्यांना दिला कडक इशारा
Sunil Gavaskar Slams : भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर भारतीय खेळाडूंच्या सुमार क्षेत्ररक्षणामुळे अत्यंत संतप्त झाले आहेत.

Sunil Gavaskar On Team India Fielding Selection Rule Shreyas Iyer : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील टी-२० मालिकेत श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने ३-० असा दणदणीत ‘व्हाईट-वॉश’ दिला असला, तरी भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) भारतीय खेळाडूंच्या सुमार क्षेत्ररक्षणामुळे अत्यंत संतप्त झाले आहेत. या मालिकेत भारतीय खेळाडूंनी अनेक सोपे झेल सोडले आणि क्षेत्ररक्षणात अत्यंत सामान्य चुका केल्या. यावर भाष्य करताना गावस्कर यांनी भारतीय निवडकर्त्यांना एक अत्यंत कडक सल्ला देत अशा खेळाडूंना थेट संघातून बाहेर करण्याचा मार्ग दाखवण्यास सांगितले आहे.
“४ खेळाडूंना लपवणे कर्णधाराला शक्य नाही!”
‘स्पोर्टस्टार’ मधील आपल्या स्तंभात (Column) लिहिताना गावस्कर म्हणाले, “जर एखादा खेळाडू सरासरी किंवा सुमार दर्जाचा क्षेत्ररक्षक असेल, तर त्याला थेट संघातून बाहेरचा रस्ता दाखवणे अत्यंत आवश्यक आहे. कर्णधाराने मैदानात ३ ते ४ सुमार क्षेत्ररक्षकांना चेंडू त्यांच्याकडे जाणार नाही या अपेक्षेने लपवून ठेवावे, असा कोणताही मार्ग असू शकत नाही.” आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यातील मानहानिकारक पराभवानंतर भारतीय संघातील ‘गेम अवेअरनेस’ आणि खराब शॉट सिलेक्शनवरही त्यांनी जोरदार निशाणा साधला.
‘स्मार्ट क्रिकेट’ खेळण्याचा दिला सल्ला!
🚨 SUNIL GAVASKAR SLAMS INDIA TEAM PLAYERS FOR POOR FIELDING 🚨
Sunil Gavaskar said 🗣️,
“It’s mandatory that if a player is an average fielder, he has to be shown the door. There is simply no way a captain has to hide three or four players, hoping the ball won’t go anywhere… pic.twitter.com/GZUH4IIFo8
— Cricket Central (@CricketCentrl) July 27, 2026
गावस्कर पुढे म्हणाले की, “फलंदाजांनी आपल्या अहंकारावर ताबा ठेवून चेंडूच्या गुणवत्तेनुसार शॉट खेळला पाहिजे. टी-२० मध्ये सतत मोठ्या फटक्यांची गरज असते, परंतु वनडे खेळपट्टीवर टिकून राहण्याची गरज असते. जगातील कोणत्याही संघाकडे पाचही अव्वल दर्जाचे गोलंदाज नसतात. टी-२० मध्ये नेहमीच ८ ते १२ षटके अशी असतात जिथे धावा लुटल्या जाऊ शकतात. त्यामुळे स्मार्ट क्रिकेट खेळून योग्य गोलंदाजाला टार्गेट करणे गरजेचे आहे.”
३८८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा इंग्लंडविरुद्ध झालेल्या २७ धावांच्या पराभवाचा दाखला देत त्यांनी फलंदाजांना संयम राखण्याचा सल्ला दिला.





