IND vs AUS : ‘हा आमचा शेवटचा दौरा…’, विजयानंतर विराट-रोहितचं मोठं वक्तव्य; नेमकं काय म्हणाले? पाहा VIDEO

IND vs AUS Rohit Sharma and Virat Kohli Interview Video : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर भारताने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियावर एकतर्फी विजय मिळवला. या सामन्यात रोहित-विराट जोडीने दुसऱ्या विकेटसाठी १६८ धावांची अखंड भागीदारी रचत भारताला विजयाकडे नेलं. रोहितने नाबाद १२१ धावांची शतकी खेळी केली, तर विराटने ७४ धावांची शानदार अर्धशतकी खेळी साकारली. या विजयानंतर दोघांनीही आपल्या कारकिर्दीतील अखेरच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भावनिक वक्तव्य केलं.
रोहित-विराटची फटकेबाजी आणि भागीदारी –
अॅडलेडनंतर सिडनीतही ‘हिटमॅन’ रोहित शर्माने आपल्या बॅटने धुमाकूळ घातला. त्याने १२५ चेंडूत नाबाद १२१ धावा ठोकल्या. दुसरीकडे, पहिल्या दोन सामन्यांत शून्यावर बाद झालेल्या विराट कोहलीने शानदार पुनरागमन करत ८१ चेंडूत ७४ धावा कुटल्या. या दोघांनी दुसऱ्या विकेट्ससाठी १६८ धावांची भागीदारी करत भारतीय संघाला विजयाचा मार्ग मोकळा करून दिला.
निवृत्तीवर मोठं वक्तव्य –
Virat Kohli and Rohit Sharma post match interview ❤️ pic.twitter.com/xfi9nCJCKH
— Abhinav (@KohliArchives) October 25, 2025
सामन्यानंतर रोहित आणि विराट यांनी माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री आणि अॅडम गिलख्रिस्ट यांच्याशी संवाद साधला. रोहित म्हणाला, “ऑस्ट्रेलियात खेळण्याचा अनुभव नेहमीच खास आहे. सिडनीच्या मैदानावरील माझ्या २००८ च्या पहिल्या दौऱ्याच्या आठवणी आजही ताज्या आहेत. हा आमचा शेवटचा ऑस्ट्रेलिया दौरा असेल. त्यामुळे आम्ही पुन्हा आम्ही खेळायला येऊ की नाही माहित नाही, पण प्रत्येक क्षण मी मनापासून जगलो. क्रिकेटचा आनंद हाच माझ्यासाठी सर्वात मोठा सन्मान आहे.”
हेही वाचा – IND vs AUS : विराट-रोहितने ऑस्ट्रेलियाचे स्वप्न मिळवले धुळीस! सिडनीमध्ये ९ वर्षांनी केला ‘हा’ खास पराक्रम
विराटनेही आपल्या भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला, “आंतरराष्ट्रीय क्रिकेट कितीही वर्षं खेळलं तरी हा खेळ नेहमी काहीतरी नवं शिकवतो. काही दिवसांत मी ३७ वर्षांचा होणार आहे, पण धावांचा पाठलाग करताना माझ्यातील सर्वोत्तम खेळी बाहेर येते. रोहितसोबत मोठी भागीदारी करणं नेहमीच आनंददायी आहे. आम्ही परिस्थिती समजून खेळण्यावर भर देतो, आणि हेच आमचं बलस्थान आहे. २०१३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत आम्ही हे शिकलो, आणि आजही तीच रणनीती आम्हाला विजय मिळवून देते.”
ऑस्ट्रेलियाचे मानले आभार –
Two legends. One mindset. Infinite belief. 💪
Virat Kohli talks about his bond with Rohit Sharma, a partnership that win games from any position! 😌 pic.twitter.com/vviSyn3Lkt
— Star Sports (@StarSportsIndia) October 25, 2025
रोहित आणि विराटने ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांचे आणि देशाचे आभार मानले. रोहित म्हणाला, “ऑस्ट्रेलियात खेळायला येणं नेहमीच आवडतं. इथल्या आठवणी आणि प्रेक्षकांचं प्रेम अविस्मरणीय आहे.” विराटनेही याला दुजोरा देत सांगितलं, “इथे आम्ही नेहमीच चांगलं क्रिकेट खेळलो आहोत. प्रेक्षकांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल मनापासून धन्यवाद.”
हेही वाचा – IND vs AUS : रोहितचा शतकी धमाका, कोहलीचा अर्धशतकी झंजावात; भारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय!
अखेरचा ऑस्ट्रेलिया दौरा –
“We enjoy our cricket!” ❤#RohitSharma reflects on his special bond with #ViratKohli after the duo combined in spectacular fashion to chase down the total in Sydney. 👏
3rd ODI Highlights – 👉 https://t.co/NMp6kZwUPd pic.twitter.com/sRoTdwMBnk
— Star Sports (@StarSportsIndia) October 25, 2025
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा हा ऑस्ट्रेलिया दौरा त्यांच्या कारकिर्दीतील शेवटचा असणार आहे. भारतीय संघ २०२७ च्या वनडे वर्ल्डकपपर्यंत पुन्हा ऑस्ट्रेलियात खेळण्यासाठी येणार नाही. या सामन्यातील विजय आणि त्यांच्या भावनिक वक्तव्याने चाहत्यांच्या मनात या दोन दिग्गज खेळाडूंच्या आठवणी कायम राहतील.





